राष्ट्रवादी, शिवसेना ,भाजप पक्षाला खिंडार शेकडो कार्यकर्त्याचा BRS पक्षा मध्ये प्रवेश

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898.उस्मानाबाद (धाराशिव ): जिल्ह्यातील.पळसप येथे मंगळवार दि.18 जुलै 2023 रोजी येथील हिंगळजमाता मंदीरात घेण्यात आलेल्या( BRS) भारत राष्ट्र समिती पार्टीच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या गावातील भाजप ,राष्ट्रवादी ,शिवसेनेच्या ग्रा.प सदस्या सहीत शेकडो कार्यकत्यांनी BRS पार्टीचे जिल्हा समन्वयक रामजीवन बोंदर यांच्या हस्ते प्रवेश केला यावेळी BRS पार्टीचे जेष्ट नेते प्रा .मारुती कारकर , तालुका समन्वयक अॅड विश्वजीत शिंदे , धाराशिव शहर समन्वयक शशिकांत बेगमपुरे , संजय भीसे ,शिवाजी काळे , शरद कोळी आदी मान्यवर उपस्थीत होते .

यावेळी हिराचंद दत्तु पुटाणे ग्रा प. सदस्य , प्रेमचंद भानुदास लाकाळ , पांडूरंग तुपे , सावता भोसले , ज्ञानदेव सरडे , बालाजी दाणे , ऋषिकेश फुटाणे , सचीन गजधने , प्रदिप गजधने , आकाश वाघमारे , बालाजी साबळे , सहदेव बादल , शंभु ढगे , गुलचंद फुटाणे , भिमा गजधने , बाबासाहेब गजधने , बालाजी फुटाणे , गुलचंद लाकाळ , शिवाजी लाकाळ , दिलीप म्हेत्रे , सुनिल साठे , प्रदिप गजधणे , पंकज कांबळे , अनिल साळुंके , जिवन लाकाळ या व इतर कार्यकत्यांनी BRS पार्टी मध्ये प्रवेश केला यावेळी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करताना रामजीवन बोंदर यांनी सांगीतले कि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या आसतील व दलीत , पीढीत वंचीत , शोषित , बेरोजगारी , आरोग्य , लाईट , पाणि , अन्याय आत्याचार ,भ्रष्टाचार इ. गोष्टी संपवायच्या असतील तर आपण के चंद्रशकर राव यांच्या भारत राष्ट्र समीती पक्षाच्या पाठीशी उभे राहून येणाऱ्या निवडनुकीत राज्यातील सर्वच पार्टीच्या प्रस्थापिंताना चीतपट करण्याची गरज आहे . राज्यात चारही पक्ष एकत्रीत येणे म्हणजे निष्टावंत कार्यकर्ता व निष्टावंत मतदारांचा आपमान झालेला आहे . मतदार यांना कधीच माफ करनार नाहीत तसेच राज्यात घडलेल्या नाट्यमय प्रकारामुळे लोकशाहीला धोका निर्मान झालेला आहे पण बोंदर यांनी सांगीतले राज्यात BRS पार्टीची सत्ता आल्या बरोबर तेलगंनाचे सर्वांगीण विकासाचे मॉडल महाष्ट्रात राबवले जाईल यासाठी आपण आजपासुन कामाला लागवे व के चंद्रशेखर राव यांनी तेलंगनामध्ये राबविलेल्या योजना घराघरात जाउन सांगाव्यात व राजकीय आंदोलन करण्याची तयारी करावी .यावेळी अब की बार किसान सरकार च्या घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करूण परिसर दणाणून सोडला.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!