दिव्यांग व्यक्तींनी वैश्विक ओळखपत्र (UDID CARD)
साठी तपासणी करून घ्यावी.

starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


उस्मानाबाद,दि,19जुलै 2023:- उस्मानाबाद जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ देणेच्या अनुषंगांने मा.जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे सदर समन्वय समितीची बैठक दिनांक20/06/2023 रोजी मा. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदरच्या बैठकीस सचिव म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सुर्यकांत भुजबळ यांनी कामकाज पाहीले बैठकीच्या सुरुवातीस सर्व उपस्थितीत सदस्यांचे स्वागत करून विषयसुचीनुसार बैठक सुरू करण्यात आली. सदरच्या बैठकीस डॉ. गलांडे, जिल्हा शल्यचिकीत्सक, शिक्षणाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जि.प. या व इतर कार्यालयाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन पोर्टलवरती वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) मिळणेसाठी नांव नोंद केलेली आहे अशा व्यक्तींसाठी तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते मात्र सदरच्या शिबीरास अल्प प्रतिसाद मिळाले असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे पोर्टलवरती दिव्यांग व्यक्तींची संख्या मोठया प्रमाणात आहे पोर्टलवरती नांव नोंद केलेली आहे अशा व्यक्तींनी जिल्हा सामान्य रूग्णालय,उस्मानाबाद येथे दर बुधवारी तपासणी करीता उपस्थित राहावे त्याचबरोबर उपजिल्हा रूग्णालय,कळबं येथे दर बुधवारी कळंब व वाशी तालुक्यातील लाभार्थ्यासाठी, उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे दर बुधवारी तुळजापूर तालुक्यातील लाभार्थ्यासाठी, उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे दर बुधवारी लोहारा व उमरगा तालुक्यातील लाभार्थ्यासाठी व उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भूम व परांडा तालुक्यातील लाभार्थ्यांची तपासणी करणेत येत आहे. सदरच्या ठिकाणी तपासणी झालेल्या दिव्यांग व्यक्तींचे वैश्विक ओळखपत्र (यु. डी. आय. डी. कार्ड ) त्यांच्या घरपोच पोस्ट ऑफीसमार्फत मिळणार आहे. ज्या दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन नोंदणी करूनही अद्यापर्यंत तपासणी करून घेतलेली नाही अशा दिव्यांग व्यक्तींनी वरील नमुद ठिकाणी नोंदणी केलेली कागदपत्रे घेवून तपासणी करावी अन्यथा सदरचे अर्ज 30 दिवसानंतर निकाली काढण्याची प्रक्रीया जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद यांच्याकडून करण्यात येईल.

तरी ऑनलाईन नांव नोंद केलेल्या दिव्यांग व्यक्तींनी जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधून तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!