जिल्हयातील उमेदवारांकरिता दि 1 जुलै ते 31 जुलै 2023 दरम्यान “कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण” मोहिमेचे आयोजन.

starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


उस्मानाबाद,दि,19जुलै 2023 :- कौशल्य, रोजगार उदयोजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही राज्यामध्ये कौशल्य विकास उपक्रमांची अंमलबजावणी व संनियत्रण करणारी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत असून केंद्र व राज्य शासन पुरूस्कृत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात.

सदयस्थितीत कौशल्य विकास आराखडयाच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियान व किमान कौशल्य विकास कार्यक्रम यासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता राज्यातील युवक- युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणा दरम्यान स्वारस्यामध्ये वृध्दी होउन प्रशिक्षण यशस्वी उमेदवारांना रोजगार स्वंयरोजगाराच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होतील.

राज्यातील वय 18 ते 45 वर्ष गटातील युवक-युवतींना मागणीवर आधारित (Demand Driven) कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी “कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण” मोहिमेचे दिनांक 01 जुलै ते 31 जुलै, 2023 दरम्यान आयोजन करण्यात येत आहे. सदर मोहिमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून त्या गुगल फॉर्मची लिंक https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8 अशी आहे.

त्याअनुषंगाने सर्व शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालयातील विविध शाखेतील विदयार्थी , शालेय/महाविदयालयीन शिक्षणातून गळती झालेले/शिक्षण सोडलेले/ नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार तथापि , समाजातील वंचित घटकातील उमेदवारांचा यात प्राधान्याने समावेश होण्यासाठी या उपक्रमांतर्गत “कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण” गुगल फॉर्म भरण्यासाठी दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत उपलब्ध असणार आहे. तरी जास्तीत जास्त्‍ गरजू उमेदवारांनी “कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण” गुगल लिंकद्वारे फॉर्म भरावा असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता उस्मानाबाद यांनी केले आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!