‘१ रुपयात पिक विमा’ या महत्त्वपूर्ण योजनेचा सोनारी येथील उ.जि..बँक लि. शाखेत शुभारंभ.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने दि १८ रोजी ‘१ रुपयात पिक विमा’ या महत्त्वपूर्ण योजनेचा सोनारी येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक लि. शाखा सोनारी मंडळातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचे केले विमा संरक्षण.
२०२३ खरीप हंगामातील नैसर्गिक बदलांमुळे व या आधी अनेकदा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊन पिकांचे नुकसान झाले होते. पीकविमा काढलेला असल्यास पिकांचे नुकसान झाल्यास पीक विम्याचा लाभ होतो, पण जर नुकसान नाही झाले तर मात्र विम्यासाठी भरलेल्या हजारो रुपयांचा शेतकऱ्यांवर भार या आधी २०२०,२१,२२ या वर्षी सहन करावा लागला व विमा कंपनी उस्मानाबाद/ धाराशिव जिल्ह्यातून Bajaj allianz crop insurance कंपनी, AIC कंपनी ने पळ देखील काढून शेवटी शेतकऱ्यांना हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने दिलासा मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली यासाठी शेतकऱ्यांनी आभार मानावे तेवढे थोडेच यामुळे मागील कारणासाठी अनेक शेतकऱ्यांचा पीकविमा न काढण्यावर भर कमी झाला असून २०२३ पीकविमा प्रीमियमचा शेतकऱ्यांवरील भार केंद्र व राज्य सरकारने हलका केल्याने आता शेतकऱ्यांना याचा लाभ तर होणार आहे. तसेच या निर्णयानुसार शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरायचा असून उर्वरित सगळी रक्कम राज्य सरकार भरणार आहे यामुळे शेतकरी बांधवांमध्ये अधिक आनंदाचे वातावरण जरी असले तरी देखील पाऊसाने दडी मारल्यामुळे पेरणी संकट हे मात्र थांबले नाही दुबार पेरणी चे संकट हे यावर्षी काही मंडळात तर काही मंडळातील गावात देखील आहे या वेळी जिल्हा बँक चे शाखाधिकारी तानाजी भांडवलकर, विस्तार अधिकारी कृषी सुरज बोडके, ग्रामसेवक चौधरी जी, लघुउद्योग सल्लागार गणेशदादा नेटके, कॅशीयर प्रमोद गोंधळी, एस. बी. डांगे, सेक्रेटरी संतोष खुळे उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!