मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राहुल कलाटे यांनी घेतली भेट.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रात्री मुंबईत भेट घेतली. राहुल कलाटे हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी राहुल कलाटे यांच्यासोबत माजी नगरसेवक नवनाथ जगताप हे उपस्थित होते. तर काही माजी नगरसेवक देखील कलाटे यांच्यासोबत शिवसेनेत जाणार आहेत. त्यात माजी नगरसेवक नवनाथ जगताप, संपत पवार, माजी नगरसेविका अश्विनी वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे .स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहे. त्यांच्यासारखा चांगला सहकारी भविष्यात मिळणार आहे. याचा मनापासून आनंद आहे. राहुल कलाटे यांचा करिष्मा आहे. त्यांच्या समवेत येणाऱ्या सहकार्यामुळे मतदार संघाच्या विकासाच्या कामाला गती दिली जाईल याबाबत बोलताना राहुल कलाटे म्हणाले की मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आज सर्व सामान्य जनतेला थेट कनेक्ट होणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!