पावसाळयात जलजन्य आजाराबाबत घ्यावयाची काळजी व उपाय योजना.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898                          

 दिनांक : 18 जुलै 2023  उस्मानाबादः सध्या पावसाळयाचे दिवस चालू झाले आहे आणि पावसाळया मध्ये अनेक आजार व साथरोग उद्भवतात तसेच पावसाळयामध्ये जलजन्य व किटकजन्य आजारांमुळे आरोग्यावर परिणाम होतात. तसेच पावसाळयात होणाऱ्या आजारापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत पावसाळयात होणारे जलजन्य आजार टाळण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात असून पावसाळयात किटक जन्य व जलजन्य आजाराबाबत काळजी घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जातात. पावसाळयात उद्रेका बाबत करावयाची उपाययोजना या बाबींकडे विशेष लक्ष देणे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळयामध्ये पाण्याचे स्त्रोतविविध कारणामुळे दुषित होत असतात जसे की, जलस्त्रोत, जुनाट आणि गंजलेले नळ व गटारामधून जाणाऱ्या जल वाहिन्या नळ पाइप लाईन्स गळती, नळाचे कनेक्शन जमिनीच्या पातळी पेक्षा कमी असते. तसेच दुषित पाणी झाल्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य काविळ, विषमज्वर इत्यादी आजाराची लागन होण्याची शक्यता ना कारता येत नाही, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी केले.

 

जलजन्य साथीचे आजार होऊ नये, यासाठी नागरिकांनी खालील बाबीवर घ्यावयाची काळजी

            शुध्दीकरण केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे, पिण्याचे पाणी गाळून व दहा मिनिटे उकळून प्यावे, पिण्याचे पाणी झाकून ठेवावे व लांब दांडयाच्या भांडयाचा वापर करावा, पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरिन गोळया किंवा द्रावण वापरावे, जेवण्यापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ साबण पाण्याने धुवावेत, अतिसार झाल्यास क्षार संजीवनी मिश्रणाचा ( ओ. आर. एस. ) वापर करावा. व अन्न सेवन सुरु ठेवावे. तसेच घरात उपलब्ध असलेल्या द्रव पदार्थ उदा. ताक, शहाळयाचे पाणी, डाळीचे पाणी किंवा भाताची पेज इत्यादी भरपूर प्रमाणात घ्यावेत.

        आरोग्य विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करणेसाठी जिल्हास्तरीय शिघ्र प्रतिसाद पथकाची व नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका स्तरावर देखील शिघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागा मार्फत जिल्हयातील पिण्याच्या पाणी स्त्रोतांची नियमितपणे पाणी तपासणी करण्यात येत आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!