स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- पिंपरी चिंचवड शहराचे जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेली पावणा नदी रविवारी दिनांक 16 पुन्हा फेसाळली. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नदी सुधार प्रकल्प हाती घेतले आहेत. तर दुसरीकडे महापालिकेचे ढीम्म प्रशासन नदी सुधार बाबत कुठलीही कारवाई करत नसल्याने पवनामाईची पूर्ती वाट लागली आहे. त्यामुळे पवना नदीच्या प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले थेरगाव येथील केजु देवी बंधारा ते चिंचवड गावातील श्री मोरया गोसावी घाट यादरम्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात पेसाळली शहरातील ड्रोनिकचे पाणी कुठलीही प्रक्रिया केल्याशिवाय थेट नदी पात्रात सोडले जाते. तसेच रसायन मिश्रित पाणी देखील नदीत मिसळते. यामुळे पवना नदीची दुरावस्था झाली आहे. जलपर्णी वाढणे पाण्यावर फेस येणे हे प्रकार सातत्याने सुरू आहेत. नदीचे आरोग्य बिघडल्याने त्याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर देखील होत आहे. नदी थेट ड्रोनितचे पाणी, केमिकल मिश्रित पाणी सोडले जाऊ नये याबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आले आहेत नदी प्रदूषित होण्याच्या कारणाच्या तळाशी जाऊन यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे मात्र महापालिका प्रशासन असे करताना दिसत नाही. मात्र महापालिका प्रशासन असे करताना दिसत नाही पालिका आयुक्ता आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. पवना नदी प्रदूषण झाल्याने नदीतील मासे आणि इतर जलचर प्राण्यांच्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. भर पावसाळ्यात देखील नदी फेसाळाचे प्रकार घडत आहेत त्यामुळे याबाबत मालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात तसेच संबंधित टावर कठोर कारवाई करावी असे खासदार शरण बांधणे म्हणाले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.