जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला भावपूर्ण निरोप

starmazanews_v

starmazanews_v


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
देहू:- जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीने गुरुवारी सकाळी सहा वाजता पिंपरी गावातून देहूकडे प्रयाण केले. महिला भगिनींनी पहाटेच पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळी काढली होती. चिंचवड लिंक रोडवर गजानन महाराज मंदिराजवळ काही वेळ पालखी थांबल्यानंतर साडेआठ वाजायच्या सुमारास चिंचवड गावातील मोरया हॉस्पिटल समोर संत तुकाराम महाराज व श्रीमान महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या एकत्रित पालखीचे दर्शन सोहळा भाविकांना अनुभवता आला. दोन्ही पालखीवर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. व त्यानंतर आरती झाली. दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. येथे तासभर विसावा झाल्यानंतर पालखी चाफेकर चौकातून प्रेम लोक पार्क, दळवी नगर, खंडोबा माळ चौक आकुर्डी, त्यानंतर पुणे मुंबई महामार्गावरून निगडी भक्ती शक्ती चौक वरून देहूरोड मार्गे देहू कडे मार्गस्थ झाली सकाळी हजारो भाविकांनी ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती‌ पालखी देहू मध्ये मुख्य मंदिरात आल्यानंतर भाविकांनी पालखीचे दर्शन घेऊन वारकऱ्यांनी एकमेकांना आलिंगन देऊन पालखीला व वारकऱ्यांना मन भावे निरोप देऊन आषाढी वारी व पालखी सोहळ्याचे समारोप करण्यात आला.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!