मोशीतील पाण्याच्या टाकीचा ‘शुभारंभ’

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- मोशी बोर्हाडेवाडी येथील ८००मी.मी. जलवाहिनी आणि पाण्याची टाकी उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे परिसरातील सुमारे 50 लाख नागरिकांना होणारा पाणीपुरवठा नियोजन सक्षम होणार आहे. अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश दादा लांडगे यांनी दिली. भोसरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने मोशी येथील सेक्टर नंबर ६ बोराडे वाडी येथील जलवाहिनी व पाण्याच्या टाकी भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पाडला. ८०० मी. मी.
व्यासाची जलवाहिनी आणि सावता माळीनगर येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरू करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, माजी स्थायी समिती सभापती विलास मडगिरी, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, सारिका बोराडे, अश्विनी जाधव, यांच्यासह हनुमान लांडगे, सोनम जांभुळकर, वंदना आलाट, निलेश बोराडे, निखिल बोराडे, निखिल काळकुटे, शिवराज लांडगे, राजेश सस्ते ,गणेश सस्ते, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, उप अभियंता शेखर गुरव, कनिष्ठ अभियंता विजय लांडे ,अनिल इथे आदी मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!