स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पुणे:- नितेश राणेच्या व तव्यावरून तृतीयपंथी आक्रमक झाले आहेत. यामध्ये पोलीस व तृतीयपंथी यांच्यात झटापट झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा खेळ खंडोबा सुरू आहे. राजकीय नेत्यांकडून टीका टिपणी बरोबरच वादग्रस्त वक्तव्यही केली जात आहेत .काही जणांकडून तर अक्षरशा जीभ घसरण्या इतपत वाईट वक्तव्य केली जाऊ लागली आहेत. अशातच नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नितेश राणे यांनी ,”हे बघा हिजड्यांचे सरदार” असं वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्यावर राणीने केलेल्या टीके नंतर पुण्यात तृतीयपंथी चांगलेच आक्रमण झाले आहेत. त्याबाबत तृतीयपंथी यांनी महाराष्ट्रात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. पुण्यात मध्यरात्री बंडगार्डन पोलीस स्टेशन बाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. मात्र पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून न घेतला त्यामुळे तृतीयपं त्यांनी मध्यरात्रीपासूनच आंदोलन सुरू केले आहे. सकाळी आंदोलन सुरू असताना पोलीस आणि तृतीयपंथी यांच्या झटापट झाल्याचे दिसून आले यावेळी पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाखाली पडत असल्याचा आरोपी यावेळी तृतीयपंथी आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.