पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- चिखली परिसरात वाहन चोरी करून चोरलेल्या वाहनांचा वापर करून इतर ठिकाणी चोरी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून ४ लाख ३९ हजारांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिगंबर काशिनाथ जमदारे वय 19 रा. बालगरे वस्ती कुदळवाडी चिखली पुणे प्रतिक गुलाब गोडसे व 26 रा.घरकुल चिखली पुणे वैभव संजय कापरे वय 19रा. राहणार नेवाळे वस्ती चिखली पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त डॉक्टर काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना 10 जुलै रोजी रात्री दहा वाजता पूर्णा नगर चिंचवड येथे काही जण रिक्षामध्ये अंधारात साहित्य भरत होते त्यावेळी त्यांना संशय आला व त्यांनी कसून विचारपूस केली असता त्यांच्याकडून चोरी केलेला माल व रिक्षा हस्तगत केल्या त्यांचीही कृती संशोधपत वाटल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आणि विचारपूस केली सुरुवातीला त्यांनी पोलिसांनी उडवडीचे उत्तरे दिली ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब ओपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर ,पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गोमाणे, पोलीस अंमलदार साकोरे, सावंत, शिंदे राठोड, सुतार, पिंजारी गायकवाड यांनी केली आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.