बार्शी नाका येथे फळ विक्रेत्यांना हातगाडे लावण्यास परवानगी देण्याची मागणी.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – शहरातील बार्शी नाका येथील जिजाऊ चौकात खुल्या जागेच्या कंपाउंड लगत फळ विक्री हातगाडी लावण्यास परवानगी देण्यात यावी. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून परवानगी न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा फळ विक्री करणाऱ्या फळ विक्रेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दि.११ जुलै रोजी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरातील बार्शी नाका, जिजाऊ चौकात गेल्या १५ वर्षापासून या ठिकाणी असलेले फळ विक्रेते फळ विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या ठिकाणी ते व्यवसाय करताना वाहतुकीस अथवा रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण करीत नाहीत किंवा होत नाही. तसेच त्यांनी आजपर्यंत नगर पालिकेच्या मालकीच्या कोणत्याही जागेत कसल्याही प्रकारचे अतिक्रमण केलेले नाही. ते रस्त्यालगत असलेल्या नालीपासून ५ फूट अंतरावर पाठीमागे कंपाऊंडला लागून हात गाडे लावून फळ विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. परंतू नगर परिषदेने दि.२७ मे रोजी नगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण केले आहे असे या फळ विक्रेत्यांचे हातगाडे काढले आहेत. येथील सर्व फळ विक्रेते दलित व मागासवर्गीय प्रवर्गातून असल्यामुळे त्यांचा विनाकारण जाणीवपूर्वक छळ व अन्याय करण्यात येत आहे. तसेच न.प. कार्यालयाने व राजकीय समाजकंटकांनी फळ विक्रीचे हातगाडे अतिक्रमणाच्या नावे काढल्यापासून त्या फळ विक्रेत्यावर उपासमारीची वेळ आलेली असून त्यांना आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे या फळ विक्रेत्यांनी कुठल्याही नियमांचे उल्लंघन केले नाही. त्यामुळे त्यांना नालीपासून ५ फूट अंतरावर हातगाडे लावण्यास रीतसर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावर रवींद्र झोंबाडे, काकासाहेब पेठे, लाला शेख, कमलाकर एडके, साहिल सहाणे व संजय पेठे यांच्या सह्या आहेत.


starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!