नवोदय प्रवेश परीक्षेत श्रेणिक सिताराम पौळ याची निवड झाल्याबद्दल सत्कार.

starmazanews_v

starmazanews_v

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे निवड झाल्याबद्दल श्रेणिकचा शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते सत्कार

परंडा : शहरातील विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षेत श्रेणिक सिताराम पौळ याची निवड झाल्याबद्दल शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांच्या हस्ते विश्वसिध्दी कॉम्प्लेक्स येथे सत्कार करण्यात आला.
सन २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर प्रवेश परिक्षेत श्रेणिक सिताराम पौळ यांची निवड झाली आहे. इयत्ता पहिली पासून पौळ हा विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होत होता. राज कोचिंग क्लासेसचे संचालक सुजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासात योग्य सातत्य व नियोजन करून जवाहर नवोदय परिक्षेत यश संपादन केले.या निवडीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी मनोज पाटील, मार्गदर्शक सुजित देशमुख, सिताराम पौळ ,दादा डाके आदींची उपस्थिती होती.या विद्यार्थ्यांला सुजित देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.जवाहर नवोदय परिक्षेत निवड झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख पदी रणजित पाटील यांच्या निवडीबद्दल सत्कार


शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र रणजित पाटील यांची धाराशिव जिल्हाप्रमुख पदी निवड झाली आहे. रणजित पाटील हे प्रमुख पदावर कार्यरत झाल्यामुळे येत्या काळात त्यांच्या हातून चांगले कार्य घडावे, अशा शुभेच्छा राज कोचिंग क्लासेसचे संचालक सुजित देशमुख यांनी दिल्या. यांच्या वतीने फेटा, शाल व पुष्पहार घालून रणजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोज पाटील, सुजित देशमुख, सिताराम पौळ, अशोक वडतिले, श्रेणिक पौळ उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!