शेतकरी आंदोलनातील गुन्हे काढून घ्या…शंकर गायकवाड.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


बार्शी (प्रतिनिधी) दि.७ जुलै, शेतकऱ्यांना शेती करून फायदा होण्याऐवजी तोटाच होत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जागृत झालेले शेतकरी मात्र आत्महत्येचा पर्याय न अवलंबता शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विविध स्वरूपाची आंदोलने करीत असतात! अशा विविध आंदोलनामध्ये हजारो शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल केले जातात, म्हणून असे संपूर्ण राज्यातील दाखल केलेले शेतकऱ्यांचे गुन्हे काढून घेण्यासाठी मागील सरकारच्या काळामध्ये शेतकरी संघटनेने मुंबई येथे आंदोलन करून सरकारला आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश काढण्यासाठी भाग पाडले होते. त्यानंतर राज्यातील बहुतांश गुन्हे मागे घेण्यात आले परंतु वैराग पोलीस ठाणे हद्दीतील २३५\२०१४ या गुन्ह्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये इतरही अनेक गुन्हे अद्याप पर्यंत मागे न घेतल्याने आज पुन्हा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बार्शीचे तहसीलदार यांचेमार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदने पाठवली आहेत.यावेळी गायकवाड म्हणाले की, सरकारी आदेशाप्रमाणे जीवितहानी नसलेले व पाच लाख रुपयाच्या आत नुकसान झालेले राज्यभरातील पात्र गुन्हे अधिकाऱ्यांनी काढून घ्यावेत अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावरील व न्यायालयीन लढाई लढली जाईल असाही इशारा यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गायकवाड यांनी दिला. त्यावेळी विनोद गपाट, काकासाहेब गव्हाणे, हनुमंत भोसले, शिवाजी मगर, नागनाथ काळे, विजय गव्हाणे, भीमराव बारंगुळे, नितीन गव्हाणे, रामेश्वर बारंगुळे, बाळू कोकाटे, राजाभाऊ गव्हाणे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

फोटो ओळी: छायाचित्रात बार्शीचे नायब तहसीलदार यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!