विशेष लेख…
जपानी मेंदूज्वर आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना.

starmazanews_v

starmazanews_v

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


विशेष लेख . दिनांक : 07 जुलै 2023.


जपानी मेंदूज्वरच्या घटना प्रामुख्याने ग्रामीण भागातील गरीब लोकांमध्ये विशेषतः डुकरे पाळण्याचा व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये दिसून येतात. पक्षी किंवा डूकराव्यतिरिक्त गायी, म्हशी आणि वटवाघूळामध्ये सुध्दा या रोगाच्या अॅन्टीबॉडीज आढळून येतात.या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने लहान मुलांमध्ये विशेष करून आढळतो. हा आजार स्त्री पुरुष दोघांमध्येही आढळून येतो तरीही पुरुषांमध्ये यांचे प्रमाण जास्त आढळते. जपानी मेंदूज्वराचे रुग्ण विखुरलेला स्वरुपात आढळतात.

जेई : याचे पुर्ण नाव जपानी मेंदूज्वर आहे हा आजार जापानीज इन्सेफेलाइटिस (मेंदूचा ताप ) हा एक गंभीर, अपंगत्व होण्यास कारणीभूत असणारा मज्जासंस्थेचा आजार आहे. जापनिज इन्सेफेलाइटिस विषाणूमुळे होतो. हा आजार इन्फक्टेड डासांमुळे पसरतो. हया आजारामध्ये मध्यवर्ती मज्जा संस्था ( Crntral Nervous System) बाधित होते व त्यामुळे गंभीर अशी गुंतागुतीची स्थिती (Sever Complications ) कदाचित मृत्यू होवू शकतो. जपानी मेंदूज्वर आजार कशामुळे होतो :जपानीज इन्सेफेलाईटिस आजाराच्या विषाणूंचा फैलाव डासांच्या (Infected Culex Mosquitoes) माध्यमातून होतो. हे डास नेहमी भाताची शेती, पाणथळ जागा व तलावांमध्ये राहतात. संक्रमणानंतर विषाणू मनुष्याच्या मेंदूत व मज्जा रज्जू मध्ये प्रवेश करतो. जल पक्षी व डूकरे हे आजाराचे Host आहेत. त्यांच्या शरीराध्ये जे.ई. व्हायरसची संख्या वाढते. Infected डास चावल्यामुळे मनुष्याला हा आजार होतो. या आजाराचा प्रसार एका माणसापासून दुसऱ्या माणसांकडे होत नाही. जपानी मेंदूज्वर आजाराचा अधिशयन काळ किती आहे :या विषाणूचा माणसांमधील अधिशयन काळ 5 ते 15 दिवसांचा आहे. डासांचा मादी विषाणू दूषित ” प्राण्याला चावल्यामुळे दुषित होते. नंतर या दुषित मादीपासून 9 ते 12 दिवस पर्यंत या विषांणूचा प्रसार मानवासह इतर प्राण्यांमध्ये होऊ शकतो. जपानी मेंदूज्वर आजाराची लक्षणे कोणती : या आजाराच्या सुरुवातीला 5 ते 15 दिवसांमध्ये विविध लक्षणे दिसू लागतात. फल्यू सारखा आजार, ताप, थंडी वाजून येणे, थकवा, डोकेदुखी, मळमळ, उलटी इत्यादी लक्षणे दिसून येतात. सदर आजार मेंदुमध्ये पसरुन गंभीर स्वरुप धारण करु शकतो. बऱ्याच रुग्णांमध्ये झटके, फिट येणे किंवा बेशुध्दपणा होवू शकतो. हा आजार झालेल्या 30 टक्के रुग्णांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता असते. साधारण 40 टक्के रुग्णांमध्ये आजारातून बरे झाल्यानंतर मेंदूला झालेल्या इजेमुळे लकवा व मतिमंदत्व असे आजार राहू शकतात. जपानी मेंदूज्वर रोगाचेनिदान केले जाते :या रोगाचे निदान प्रामुख्याने रुग्णांच्या रक्तजलातील अॅन्टीबॉडीज शोधून किंवा ELISA पध्दतीव्दारे तसेच पाठीच्या मणक्यातील पाण्याच्या तपासणी व्दारे करण्यात येते. जपानी मेंदूज्वर आजार कोणाला होण्याची जास्त शक्यता असते: ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भाताची शेती व डुकरांची संख्या आहे अशा भागांतील लोकोंमध्ये हा आजार पसरु शकतो.1 वर्षे ते 15 वर्षे या वयोगटातील मुले-मुलींना हा आजार होण्याची शक्यता प्रमाणात असते. जपानी मेंदूज्वर आजारावर उपाययोजना कोणती : या आजारावर स्पेसिफक अशी उपाययोजना उपलब्ध नाही. JE विषाणू विरुध्दचे परिणाम कारक औषधे उपलब्ध नाहीत. JE आजारांच्या लक्षणावर वेळीच उपचार होण आवश्यक आहे. जेणे करुन आजाराची Complications टाळता येऊ शकतात. जपानी मेंदूज्वरावर कोणताही विशिष्ट असा उपचार नाही. जपानी मेंदूज्वर आजार होणे कशा प्रकारे टाळू शकतो : JE आजारावर प्रतिबंध करण्यासाठी JE लसींने लसीकरण करणे (JE Vaccination) हाच प्रभावी उपाय आहे, डासांपासून संरक्षण केल्यामुळे देखील JE आजाराचा प्रसार टाळतो, रुग्ण मोठया रुग्णालयात हालवण्यासाठी वाहतुक व्यवस्था करणे,घरांमध्ये फवारणी, डास अळीप्रतिबंधक उपाययोजना खड्डे बुजवून पाण्याचे साठे कमी करणे. डुकरांच्या संख्येवर नियंत्रण करणे, वेळोवेळी भातशेती मधील पाण्याचा निचरा करणे,वैयक्तीक संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करणे. डास प्रतिबंधक विविध साधनांचा वापर करणे,डुकरांची निवासस्थाने वस्तीमध्ये न ठेवणे, आपापल्या गावांमध्ये मेंदूज्वराचा रुग्ण आढळल्यास ताबडतोब आरोग्य कर्मचारी किंवा गावच्या सरपंचांना सूचित करावे.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरुवातीला 1 ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींचे एकाच वेळेस JE लसीच्या एका डोसने लसीकरण केले जाते.त्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत JE लसीचे दोन डोस पहिला डोस वयोगट 9 ते 12 महिने व दुसरा डोस 16 ते 24 महिने दिले जातात. यांनी केले आहे.

लेखक

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!