डेंग्यू आजाराची प्रतिबंधात्मक काळजी घ्या, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


उस्मानाबाद,दि,07जुलै 2023 :- उस्मानाबाद ग्रामीण व शहरामध्ये शहरी भागामध्ये किटकजन्य आजाराचा सद्या काही गावांत भागात ताप रुग्ण संख्येत व डेंग्यू सुदृश्य रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. उस्मानाबाद ग्रामीण व शहरी भागामध्ये पावसाळयामध्ये डबके साचून डासोत्पत्ती स्थानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डासाची पैदास वाढ होऊन किटकजन्य आजाराची साथ उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच उस्मानाबाद शहरी व ग्रामीण भागामध्ये किटकजन्य आजाराचे डेंग्यूचे रुग्ण वाढ होण्याची शक्यता आहेत. तरी प्रतिबंधात्मक कार्यवाही ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात याव्यात असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी नागरिकांना केले.तसेच डेंग्यूच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. हयास प्रामुख्याने वातावरणातील पोषकबदल, तापमान, आर्द्रता व नविन निर्माण होणारी डासोत्पत्ती स्थाने कारणीभूत असतात. त्यामुळे योग्य त्याप्रतिबंध व नियंत्रणासाठी उपाययोजना सतर्कतेने राबविणे गरजेचे आहे.



उद्रेक होऊ नये याकरीता काही उपाय योजना तात्काळ आमलात आणाव्या लागतील जोखीमग्रस्त गावांची निवड करावी.आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत दैनंदिन गृहभेटीमध्ये ताप सर्वेक्षण व किटक शास्त्रीय सर्वेक्षण करणे. हाऊस कंटेनर इंडेक्स, बॅटयू इंडेक्स काढणे व हाऊस इंडेक्स १० टक्के पेक्षा जास्त ताप रुग्ण वाढलेले गावावर लक्ष ठेवणे.तापीचे रुग्ण संख्येत वाढ आढळून आलेल्या भागामध्ये तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ताप सर्वे, अबेट कार्यवाही करण्यात यावी. ताप रुग्ण, डेंग्यू सदृश, दूषीत रुग्ण आढळून आलेल्या संबंधित गावातीले सरपंच ग्रामपंचायत व शहरी भागात नगरपालिका यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कळविले आहे. आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळून वापरावयाचे पाणी साठे घासून पुसून स्वच्छ ठेवणे. व्यक्तीगत प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी डास प्रतिबंधक क्रिम, लिक्वीड मच्छरदानी क्वाईलचा वापर करणे व अंग झाकले जाईल असे कपडे वापरणे. शाळेतील विद्यार्थी, कॉलेज अंगणवाडी, आशा, महिला बचतगट यांना डास अळी दाखवून यांचे मध्ये डेंग्यूची लक्षणे व डासेत्पत्ती स्थान दाखवावेत.ताप रुग्ण व डेंग्यूचे रुग्ण ज्या भागात आढळून आलेले आहेत अशा ग्रामीण व शहरी भागात आजाराचे प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत धूर फवारणी करण्यात येईल.

एकात्मीक किटक व्यवस्थापन :डासोत्पत्ती रोखण्यासाठी एकात्मिक किटक व्यवस्थापन ही संकल्पना व्यवहारात राबविणे आवश्यक आहे याकरीता स्थानिक गरजांनुसार खालील बाबींवर विशेषभर देण्यात यावा, परिसर अभियांत्रीकी डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे अथवा वाहती करणे, जोखमीच्या भागात किटकनाशक धूर फवारणी,अळी नाशकांचा वापर, डासांचे जैविक नियंत्रण – गप्पी माशांचा प्रभावी वापर, वैयक्तिक संरक्षण-मच्छरदाण्या, डास प्रतिरोधक क्रिम, खिडक्यांना जाळया इत्यादी. उद्रेक यवस्थापन: या आजाराच्या संनियंत्रणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना रुग्णालय स्तरावर तसेच कार्यक्षेत्रामध्ये करण्यात -प्रसिध्दी : या आजाराच्या सनियंत्रणासाठी लोकांनी करावयाच्या उपाययोजने बाबत सर्वांना अवगत करणेत यावे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी कळविले आहे.


starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!