www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
उस्मानाबाद,दि,05जुलै 2023 :- जिल्ह्यातील एकही बाधित शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या,वेळेवर पंचनामे करून पारदर्शक आणि गतिमान काम करा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज खरिप हंगामाच्या 2023 च्या आढावा बैठकीत विमा अधिका-यांना दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ची जिल्हास्तरीय समिती ची बैठक आज जिल्हाधिकारी डो.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यलयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने,कृषी उपसंचालक अभिमन्यु काशीद, कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड,जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक सचिन ससाने, एच डी एफ सी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक हरिओम सोलंके,बाळासाहेब गोपाळ, अमोल मुळे तसेच सर्व तालुका समन्वयक उपस्थित होते.
पंचनामा करण्यासाठी जातांना कृषी विभागास अवगत करणे आवश्यक आहे.पंचनामे गतिमान आणि पारदर्शक व्हावेत यासाठी मनुष्यबळ वाढवा तसेच तालुका समन्वयकासाठी स्वतंत्र कार्यलय आणि दूरध्वनिची व्यावस्था करावी .एकाच क्षेत्रातील वेगवेगळ्या शिवारात पंचनामे करतांना नुकसानात तफावत येणार नाही याची काळजी घ्या, आणि मिळालेल्या नुकसानीच्या सूचनांचे शंभर टक्के पंचनामे करा, असेही जिल्हा जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
पुढे जिल्हाधिकारी म्हणाले,उस्मानाबाद जिल्हयात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांमध्ये योजनेसंबंधी जागृती निर्माण करण्यासाठी व प्रशिक्षण देण्यासाठी विमा कंपनीने कृति आराखडा तयार करुन आवश्यक मनुष्यबळ व साधसामुग्री उपलब्ध करावेत. पीक हंगाम सुरु होण्यापुर्वी संबंधित विमा कंपनीने तज्ञ, अनुभवी व प्रशिक्षित विमा प्रतिनिधींची नियुक्ती लेखी स्वरुपात जाहीर करावी व त्याचा तपशिल कृषि विभागास सादर करावा.जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर दुरध्वनी सुविधा असलेल्या कार्यालयाची स्थापना त्वरीत करुन त्याचा तपशिल या कार्यालयास सादर करावा. तसेच जिल्हा कार्यालयात कृषि पदवीधारक प्रतिनिधीची नियुक्ती करणे आवश्यक असुन तालुकास्तरावरील कार्यालयात देखिल कमीत कमी एका प्रतिनिधीची नेमणुक करावी.तालुका व जिल्हास्तरावर सुविधा केंद्र सुरु करण्यात यावेत. सदर सुविधा केंद्रामार्फत शेतकऱ्यांना पिक विमा ऑनालाईन भरणेबाबत मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निरसन अरुन व नुकसान भरपाई बाबत शंकाचा समाधान करण्याची कार्यवाही करावी . नुकसानाची टक्केवारी व्यवस्थित घ्या,पंचनामा करण्यासाठी शेतक-यांकडून पैश्यांची मागणी करू नका
खरीप हंगाम कालावधीत प्राप्त होणाऱ्या नुकसानीच्या सुचना प्राप्त झाल्यापासुन 10 दिवासाच्या आत नुकसानीचे सर्वेक्षण पुर्ण करून अहवाल सादर करणे बधनकारक आहे. शेतकऱ्याकडून नुकसानीच्या सुचना देताना नुकसानीचे कारण चुकीचे नमुद केल्यामुळे नुकसानीच्या सुचना अपात्र करु नयेत, सदरील नुकसानीच्या सुचनांची प्रत्यक्ष पाहणी करुन वस्तूस्थिती तापसूनच त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा. विमा कंपनीकडे प्राप्त होणाऱ्या नुकसानीच्या सुचनांची शेतकरीनिहाय, पिकनिहाय माहीती दररोज कृषि विभागास उपलब्ध करुन द्यावी. सदरील माहीती सादर करत असताना त्यामध्ये, शेतकऱ्याचे नाव, गाव सर्वे नंबर, पिकाचे नाव, पिक निहाय विमा संरक्षित क्षेत्र, नुकसानीचा दिनांक, नुकसान कळविल्याचा दिनांक व नुकसानीचे कारण इत्यादी बाबी नमूद असाव्यात. नुकसानीचे सर्वेक्षण करण्याकरीता तज्ञ व अनुभवी विमा प्रतिनिधीची नेमणूक करण्यात यावी व सर्वेक्षणाचे काम हे संबंधित कृषि सहायक व शेतकरी यांचे समक्ष करण्यात यावे. तसेच सर्वेक्षण अहवाल हा संबंधित कृषि सहायक व शेतकरी यांचे समोरच परिपुर्ण भरुन म्हणजेच शेतकऱ्याचे नाव, सर्वे नंबर, पिकाचे नाव, पेरणी दिनांक, पिकाची अवस्था, पिकाचे संरक्षित क्षेत्र, बाधीत क्षेत्र, नुकसानीची टक्केवारी, सर्वेक्षणाचा दिनांक इत्यादी बाबी नमूद करुनच सदर सर्वेक्षण अहवालावर कृषि सहायकाची व संबंधित शेतकऱ्याची स्वाक्षरी घेण्यात यावी. असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री माने म्हणाले सर्वेक्षण अहवालाचा नमुना हा एक पानी असावा व वरील नमूद सर्व बाबींचा समावेश त्या एका पानावरच असावा. सर्वेक्षण पुर्ण झाल्यानंतर व नुकसानीची परिगणना करण्यापुर्वी सर्वेक्षण अहवालाची शेतकरीनिहाय, पिकनिहाय, सर्वे नंबर निहाय एक एक प्रत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करावी. पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी विमा प्रतिनिधींना शेतकऱ्याकडून पैसे न स्विकारणेबाबत सक्त सुचना देण्यात याव्यात. विमा भरपाई वितरीत झाल्यानंतर व हंगाम कालावधीत प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारीचे निराकरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी विमा कंपनीची राहील.असेही श्री.माने म्हणाले
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.