उस्मानाबाद कृषी क्षेत्रातील आव्हाने व राज्य शासनाची मदत.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


शेती अनेक अर्थाने विकासासाठी महत्त्वाची आहे. उस्मानाबादला दीर्घ आणि समृद्ध कृषी इतिहास आहे. या प्रदेशात शतकानुशतके शेती केली जात आहे, आणि उस्मानाबादच्या लोकांनी जमीन आणि तिची क्षमता याविषयी सखोल माहिती विकसित केली आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून, उस्मानाबादने आपल्या कृषी क्षेत्राचा विकास सुरू ठेवला आहे. शेती हा उस्मानाबादच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या प्रदेशात अनेक मोठ्या कृषी फार्म आहेत आणि उस्मानाबादचे लोक अजूनही कुशल शेतकरी आहेत. उस्मानाबाद हे बाजरी, कडधान्ये आणि तेलबियांचे प्रमुख उत्पादक आहे आणि मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादनही होते. उस्मानाबादच्या जनतेने शतकानुशतके अनेक आव्हानांना तोंड दिले आहे, परंतु त्यावर मात करण्याचा मार्ग त्यांनी नेहमीच शोधला आहे. जिल्हयातील कृषी क्षेत्र हे लोकांच्या मेहनतीचा आणि चातुर्याचा पुरावा आहे.

दुष्काळ आणि आपत्तीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत.गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर मध्ये झालेल्या सततच्या पाऊस,अतिवृष्टी व गोगलगाय किडीमूळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 298 कोटी पेक्षा जास्त निधी वितरीत झाला आहे.सप्टेंबर- ऑक्टोबर मधील बाधित शेतकऱ्यांना पिक नुकसानीसाठी 222 कोटी 43 लाख निधीची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे. खरीप हंगाम 2023 करीता एक लाख 9 हजार 171 क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यास 52 हजार 883 मे.टन खते उपलब्ध आहेत. खरीप हंगामाकरीता बियाणे व खताची टंचाई भासणार नाही याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

कृषी विकासात शेतरस्त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. शेतरस्त्यांची निकड लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदार यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील 384 शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत. या

शेतरस्त्यांचा 12 हजार 248 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 432 किलोमीटरचे शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात शासन हमीभाव या योजनेअंतर्गत एकूण 17 खरेदी केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रामार्फत 6 हजार 372 शेतकऱ्यांचा 11 लाख 40 हजार क्विंटल हरभरा खरेदी झालेला आहे. उस्मानाबाद जिल्हयामध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये एकुण 6,47,300 हेक्टर क्षेत्रावरती पेरणीचे नियोजन आहे.जिल्हयामध्ये सोयाबीन हे प्रमुख पिक असुन सन 2023-24 करीता 4,46,900 हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. जिल्हयामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान 760.30 मि.मि. असून माहे ऑक्टोबर 2022 पर्यंत 831.16 मि.मि. पर्जन्यमान झाले आहे.

कृषि निविष्ठा व सनियंत्रण -खरीप हंगाम 2023 करीता 109171 क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले असून जिल्हयास 52883 मे.टन खते जिल्हयास उपलबध आहे. खरीप हंगामाकरीता बियाणे व खताची टंचाई भासणार नाही याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कृषि निविष्ठा सनियंत्रणांसाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना कृषि विभागामार्फत करण्यात आलेली आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान .

सन 2022-23 मध्ये एकात्मिक फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सामुहीक शेततळे ,फलोत्पादन यांत्रिकीकरण,नियंत्रित शेती,कांदाचाळ व वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण व पॅकहाऊस या घटकारीता 788लाभार्थींना 6.15 कोटी निधीचे वितरण आलेले आहे. व सन 2023-24 करीता एकात्मिक फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सामुहीक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती, कांदाचाळ, पॅकहाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र इत्यादी घटकाकरीता रु.11.32 कोटीचा आराखडा करण्यात आलेला आहे.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (ठिबक व तुषार सिंचन ) – सन 2022-23 -9474 लाभार्थीना 7034.13 हेक्टर करीता रु. 19.67 कोटी अनुदान वितरीत करण्यात आला आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातंर्गत जिल्हयातील 287 गावाची निवड केली आहे.सन 2022-23 मध्ये 2621 अर्जदारांना रु.8.74 कोटी रक्कमेचे अनुदान त्यांच्या बँक खातेवर डी.बी.टी. पध्दतीने जमा करण्यात आलेले आहे.

कृषि यांत्रिकीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत उपअभियान -सन 2022-23 करीता 2483 लाभार्थींना रु.15.68 कोटीचे अनुदान वितरण करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना :- खरीप हंगाम 2022 मध्ये 4,98,437 शेतकऱ्यांना 340.83 कोटी नुकसान भरपाई मिळालेली आहे.

तसेच रब्बी हंगाम 2022 मध्ये 48,980 अर्जदारांनी 38,969 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.

निती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयास कृषि व जलसंधारण कामांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबदल रु. 3.00 कोटी प्राप्त बक्षीस रक्कमेपैकी रु.1.75 कोटी मंजुर आराखडयानुसार 176 बीबीएफ व 75 वैयक्तीक शेततळे अस्तरीकरणासह या घटकांचा लाभ देण्यात येणार आहे.आकांक्षित जिल्हयासाठी कृषि यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत सन 2022-23 करीता 14 औजारे बँक स्थापन करण्यात आले असून रु.1.12 कोटी अनुदान लाभार्थींनी वितरण करण्यात आले आहे. जुन 2022 पासून उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी विभागामार्फत विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले.या कालावधीत कृषी विभागाने12 हजार 644 लाभार्थ्यांना 169 कोटी 7 लाख 45 हजार रक्कम अनुदान वितरीत करण्यात आला.

जिल्ह्यातील शेतकरी खातेदारांनी “ई-पीक पाहणी” अॅप डाऊनलोड करुन त्यास भरघोस प्रतिसाद देत 4 लाख 10 हजार खातेदार शेतकऱ्यांपैकी 2 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी अॅपवर केली आहे. 2023-24 च्या या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकार प्रमाणे प्रतिवर्षी सहा हजार रुपये “नमो शेतकरी महा सन्मान निधी” तसेच एक रुपयांमध्ये पीक विमा, जलयुक्त शिवार 2.0 ला मंजुरी, मराठवाड्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रिड ची स्थापना यासह इतर अनेक शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्याचे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून लाभ होणार आहे. कारण राज्य सरकारने शेतकऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर वर्षाकाठी 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख 75 हजार 680 शेतकऱ्यांना हप्त्यापोटी 55 कोटी 13 लाख 60 हजार रुपयांची मदत होणार आहे.आधीची रक्कम एवढीच असून त्यामुळे एकूण वर्षाल रक्कम 110 कोटी 27 लाख 20 हजार रुपये होईल. शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी वर्षाला दहा टक्के प्रमाणे सौर वाहिनी करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.

उस्मानाबादमधील कृषी क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्यामध्ये हवामान बदल, पाणी टंचाई आणि कीटक यांचा समावेश आहे. तथापि, उस्मानाबादचे लोक लवचिक आहेत आणि या आव्हानांवर मात करण्यासाठी कार्यरत आहेत.



starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!