पंतप्रधानांच्या हस्ते आज राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन अभियानाचा शुभारंभ.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

राष्ट्रीय सिकल सेल अ‍ॅनिमिया निर्मूलन अभियानाचा शुभारंभ देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते व राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत साहेब व मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत आज संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या वेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सुमारे ६२०० आरोग्य संस्था स्तरावरील (जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी) अधिकारी व कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र (HWC) लहान शहादा ता. जि. नंदुरबार येथून मा. आदिवासी विकास मंत्री देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

राज्यात सिकल सेल नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून २१ जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलढाणा, नांदेड, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजी नगर, रायगड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यात एकूण सिकल सेल रुग्ण संख्या २२०८२ आणि सिकल सेल वाहकांची संख्या २६१६३३ इतकी आढळून आली आहे.

कार्यक्रमाच्या वेळी सिकल सेल रुग्ण व्यक्तींना लाल, वाहक व्यक्तींना पिवळे आणि निरोगी व्यक्तींना पांढरे कार्डाचे वाटप करण्यात आले. आजच्या उद्घाटन प्रसंगी १,८०,००० कार्ड वितरित करण्यात आले. तसेच सर्व आरोग्य संस्थांमध्ये आज सिकल सेल तपासणी करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड मिळविण्यासाठी या आरोग्य संस्थामधुन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सिकल सेल तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींना जेनेटिक कार्ड देण्यात आले.


starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!