सुप्रसिद्ध उद्योजक रामभाऊ पवार यांनी दिव्यांग संघटनेस अकरा हजाराची मदत.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा दि २९ : – परंडा येथील पवार कॉम्प्लेक्स मध्ये परंडा तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना तालूक्याच्या ठिकाणी थांबण्यासाठी , संघटनेची कामे करणे , तसेच दिव्यांगाच्या अनेक कामासाठी स्वतःच्या मालकिचा एक गाळा मोफत दिला . त्याच बरोबर दिव्यांगाच्या कार्याला मदत निधी म्हणून अकरा हजाराचा धनादेश दिव्यांग संघटनेला दिला . याच वेळी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री राम भाऊजी पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाला छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष प्राणजीत भाऊ गवंडी युवा नेते आप्पासाहेब तरटे अॅड अनंत राशिनकर साहेब,विधी व न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष महेश ठोंगे साहेब, नानासाहेब पवार साहेब, डॉ शिंदे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, संस्थापक सचिव रियाज पठाण प्रदेश उपाध्यक्ष अमोल शेळके, जिल्हा अध्यक्ष पांडुरंग मिसाळ, पांडुरंग चोबे ., कुमार सुरवशे हजर होते .तुकाराम गंगावणे , परंडा

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!