परंडा येथे मका लागवड तंत्रज्ञान विषयावर शेतीशाळा.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. श्री साई कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी, परंडा येथे मका लागवड तंत्रज्ञान विषयावर शेतीशाळा

शेतकर्‍यांनी मका पेरणी करताना बी बी.एफ तंत्रज्ञानाचा व कोकण पद्धतीचा वापर करावा- नानासाहेब साखरे


पाऊस लांबल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला उशीर झाला आहे. मका पेरणीवरील खर्च कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा व टोकन पद्धतीचा वापर करावा असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले.

परंडा तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथे श्री साई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने कृषी विभाग व आत्माच्या सहयोगाने स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतीशाळेच्या पहिल्या वर्गाचे शनिवारी दि.24 जून रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

शेतीशाळेत मार्गदर्शन करताना श्री अमोल पाटील यांनी खरीप हंगामातील पिके,मशागत, बीज प्रक्रिया , याविषयी सविस्तर माहिती दिली. श्री नानासाहेब साखरे कृषी पर्यवेक्षक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन, व बीज प्रक्रिया करून दाखवण्यात आली, शेती शाळेमध्ये सांघिक खेळ घेण्यात आला पिकाच्या वाढीचे तंत्रज्ञान या विषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

प्रारंभी कंपनीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. चेअरमन श्री.राजकुमार पाटील यांनी श्री साई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमात कंपनीच्या 30 सभासद शेतकर्‍यांना मका बियाणाचे वाटप करण्यात आले. सोबत युरिया, डी ए पी, बुरशीनाशक, व इमामेक्टिन बेंजोएट या किट चे वाटप करण्यात आले.आणि कंपनीचे सभासद शेतकरी व पिंपरखेड व टाकळी गावातील महिला, पुरूष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!