रा.गे शिंदे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा .

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे
परंडा दि .२१ जून २०२३ येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालया मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने हे उपस्थित होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून परंडा येथील मोरे हॉस्पीटल चे संस्थापक डॉ आनंद मोरे , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे , बी होक विभागाचे समन्वयक प्रा.डॉ संतोष काळे उपस्थित होते . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी डॉ आनंद मोरे यांनी योगा प्राणायाम शरीरासाठी किती महत्वाचा आहे हे प्रात्यक्षिक करून दाखविले .
अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने यांनी सांगितले की योगा हा अत्यावश्यक आहे सर्वांनी दररोज नित्य नियमाने व्यायाम करावा व आपले आरोग्य चांगले ठेवावे . कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग आणि शारिरीक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ कृष्णा परभने यांनी मांनले .यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!