न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत धाराशिव नावाचा वापर करण्यात येवू नये.

starmazanews_v

starmazanews_v

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत धाराशिव नावाचा वापर करण्यात येवू नये

अपर जिल्हादंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे.

उस्मानाबाद,दि, 22 जून  2023 :- उस्मानाबाद जिल्हयाचे नाव बदलून धाराशिव करण्याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्रमांक 3881 / 2023 दाखल असून नामांतराबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी चालू असताना महसूल व इतर विभागाशी संबंधित कार्यालये जिल्हयाचे नाव बदलत असल्याची बाब याचिकाकर्ते यांचे विधिज्ञांनी मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

त्यावर मा. उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयांनी उस्मानाबाद नावात बदल न करणे बाबत निर्देश दिले आहेत. मा. उच्च न्यायालयाच्या दि. 20 एप्रिल 2023 व दि. 14 जून 2023 रोजीच्या आदेशाची प्रत संलग्न करून जिल्हयातील सर्व विभागप्रमुख व सर्व कार्यालय प्रमुख यांना याव्दारे आदेशीत करण्यात येते की, मा. उच्च न्यायालयाच्या दि. 20 एप्रिल 2023 व दि. 14 जून 2023 चे आदेशातील सुचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे. मा. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत धाराशिव नावाचा वापर करण्यात येवू नये, उस्मानाबाद नावाचाच वापर करण्यात यावा. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी जारी केले आहे.

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!