अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा
-सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत

starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898 दिनांक : 21 जून 2023

उस्मानाबाद-दि.20 :- उस्मानाबाद नगरपालिका व शहराच्या ठिकाणी इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमधुन उपलब्ध करून देण्यात येतात. याकरिता शैक्षणिक वर्ष 2022-23 (नविन व नुतनिकरण) या वर्षातील प्रवेशित अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याकरिता www.syo.mahasamajkalyan.in हे संकेतस्थळ दिनांक 26 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आलेले आहे.

सदरील योजनेकरिता सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 वी व प्रथम वर्षास प्रवेशित विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज भरावा तसचे मागील वर्षी (11 वी व प्रथम/द्वितीय वर्षास) या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांनी नुतनीकरण म्हणून अर्ज भरावा.

ऑनलाईन प्रणालीद्वारे परिपूर्ण अर्ज भरून त्याची एक प्रत सर्व कागदपत्रे जोडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, उस्मानाबाद या कार्यालयास सादर करण्याकरिता अंतिम दि.28 फेब्रुवारी 2023 ठेवण्यात आलेला होता. नंतर वाढवून दि.15 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. तसेच नर्सिंग, डिफार्मसी व इतर व्यावासायिक महाविद्यालयांचे उशिरा परिक्षा झाल्याने निकाल उशिरा लागल्याने सदर योजनेचा सन 2022-23 चा अर्ज भरण्यासाठी दि.24 मे 2023 ते दि.5 जून 2023 पर्यंत बेबसाईट चालू करण्यात आलेली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून अनु.जातीचे गरजू विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शासन पत्र दिनांक 20 जून 2023 अन्वये सदर योजनेअंतर्गत सन 2022-23 मधील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दि.14 जुलै, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर मुदतवाढ ही अंतिम असून यापुढे सन 2022-23 करिता अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही. अनु.जातीच्या विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीमध्ये ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे दि.14 जुलै, 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज न केल्यास व विद्यार्थ्यी सदर योजनच्या लाभापसून वंचित रहिल्यास सामाजिक न्याय विभाग त्यास जबाबदार राहणार नाही, करिता विहीत मुदतीमध्ये अनु.जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बी.जी.अरवत यांनी केले आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!