स्टार माझा न्यूज:- प्रतिनिधी सोमनाथ गायकवाड . फेसबुक पेजवर हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी शकील तांबोळी रा. नाना पेठ पुणे या आरोपीस हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल गुन्हा नोंद करून समर्थ पोलीस ठाणे या ठिकाणी अटक करण्यात आली होती..
त्या प्रकरणांमध्ये पोलीस हवालदार जितेंद्र दत्तात्रय पवार यांनी फिर्याद दिली होती ..सदरचे प्रकरण हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी दरम्यान घडलेली असून सदरची पोस्टही वरील नमूद आरोपी यांनी प्रसारित केल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी तत्काळ आरोपीस अटक केले व सदर आरोपी यांना पुणे प्रथम वर्ग मे.न्याय दंडाधिकारी क्रमांक १ यांचे कोर्टात हजर करून त्या प्रकरणांमध्ये आरोपीचे वकील नामे एडवोकेट प्रतीक पवार ,एडवोकेट प्रशांत पवार यांनी योग्य आरोपीचे बाजू मांडत सत्य परिस्थिती मांडली आरोपी विरुद्ध कुठलेही पुरावे दाखल नाही व त्या अनुषंगाने मे.न्यायालय यांनी आरोपीची बाजू मध्ये कुठेही धर्मप्रसार व धार्मिक द्वेष पसरवण्याचा कोणत्या हेतू बद्दलचा पुरावा समोर आलेला नाही, असा युक्तिवाद आरोपीचे वकील श्री पवार यांनी केला,आरोपी हा निष्पाप आसून सदरची घटना हे आरोपीकडून प्रसारित झालेले नाही व सदर समर्थ पोलीस स्टेशन यांनी आरोपी विरुद्ध ६६ अ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला होता ,परंतु तो कलम सर्वोच्च न्यायालयांच्याकडून सदरचे कलम संपुष्टात आलेले आहे असे आदेशात म्हटले आहे, व पोलिसांना सदरचे कलम हटवण्यात यावे असा आदेश न्यायालयाने केला सदरची बाब सरकार तर्फे युक्तिवाद व बचाव पक्षाचे युक्तिवाद ऐकून कोर्टाचे असे निकर्षात आले की सदरचा 66 अ कलम हा संपुष्टात आलेला आहे असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या एडवोकेट प्रतीक पवार व ऍडव्होकेट प्रशांत पवार यांनी न्यायालयात मांडले असता न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून आरोपीला जामिनावर मुक्त केले..
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.