आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी! आरोग्यमत्र्यांची बैठक.

starmazanews_v

starmazanews_v

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
आषाढी एकादशी निमित्ताने ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज तसेच महाराष्ट्रभरातून मनाच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काल आरोग्य विभाग व वारकरी बांधवांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सेवा याबाबतीत आढावा बैठक घेण्यात आली.

थंडी, ताप, खोकला, पोटदुखी आधी तत्सम आजारावरचे सर्व औषधे वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना देण्यात येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या सहाशे दिंड्यासोबत एक रुग्णवाहिका व एक फिरता दवाखाना देखील सेवेत दाखल झाला आहे. हे सर्व नियोजन महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने 27, 28 व 29 जून 2023 रोजी मोफत “महाआरोग्य शिबीर” “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” पंढरपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे 20 लाख वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आज पंढरपूर येथे आरोग्य विभागाची या महाआरोग्य शिबीर व महाराष्ट्र भरातून पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसंदर्भात, नियोजन व इतर तयारी संदर्भातदेखील यावेळी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या आदेशानुसार आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात होणारे हे महाआरोग्य शिबीर अत्यंत महत्वाचे असून वारकरी बांधवांना मोठया प्रमाणात आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत.

यावेळी आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!