माॅडर्न प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे स्वागत.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- निगडी गुरुवार दि.१५ जून २०२३ रोजी यमुनानगर येथील माॅडर्न प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे सनईच्या सुरात मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.काल शहरातील विविध शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्याने नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाला असून, गुरूवार दि.१५ रोजी सर्व शाळा विद्यार्थ्यांनी फुलून गेल्या.नवे वर्ग,नवीन पुस्तकांचा सुंगध,नवे नवे शाळेचे दप्तर,तर काही चिमुकल्यांसाठी शाळाही नवीन अशा वातावरणात शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीचा कालावधी जवळपास दोन महिन्यांचा संपुन गुरुवारपासून नियमितपणे शाळा सुरू झाल्या.पुन्हा ते मित्र,पुन्हा ती मजा,पुन्हा तो शाळेत मिळणारा आनंद, विद्यार्थांचा किलबिलाट , विद्यार्थ्यांची उत्सुकता,मनात भरलेली धडकी,शिक्षकांना भेटण्याची घाई,पालकांची गर्दी अशा उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.
मॉडर्न शाळेमध्ये मुलांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प,पेन्सिल व पेढे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा समितीचे अध्यक्ष मा. श्री.चित्तरंजन कांबळे, व्हिजीटर मा.श्री.राजीव कुटे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग मराडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.तुषार कुटे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ.वर्षा आजरेकर, पालक शिक्षक संघाच्या सदस्या सौ.वर्षा पवार,सौ.ज्योती बावणे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटण्यात आली.


यावेळी मुख्याध्यापक श्री. पांडुरंग मराडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले. मा. श्री.चित्तरंजन कांबळे, मा.श्री.राजीव कुटे यांनी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थी प्रवेश शुभारंभ सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री.किरण वारके यांनी केले व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्री.कैलास माळी यांनी मानले. संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्रा.डॉ.गजानन एकबोटे यांनी सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
अशा प्रकारे शाळेचा पहिला दिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!