www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898. दिनांक १० जून २०२३ वार शनिवार रोजी संत तुकाराम सभागृहात श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेच्या सर्व शाखांतील दहावी परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी आयएएस अधिकारी शशिकांत नरवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कमतरता शोधून अभ्यासात सुधारणा केली पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रात असो,त्यात किती वेळा पडता यापेक्षा किती वेळा उठून उभे राहता है महत्त्वाचे. केवळ यूपीएससी किंवा एमपीएससीचा विचार न करता न्यायालय, संरक्षण आणि इतर क्षेत्रात ही भरपूर संधी आहेत असे प्रतिपादन केले.
अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे होते. त्यांनी देखील आपल्या मनात येते करताना विद्यार्थ्यांना योग्य असा सल्ला दिला. यावेळी संस्थेचे सचिव पी.टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता धावणे-मोहिते उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे हे उपस्थित होते.
नरवडे पुढे म्हणाले, पालकांनो असेही ते म्हणाले. मुलात इन्व्हेस्टमेंट करा. ती आर्थिक नव्हे, तर भावनिक करा. त्यांच्यावर दबाव न टाकता प्रेरणा द्या, असे पालकांना आवाहन केले. कोणत्याही क्षेत्रात जा; पण तिथे प्रावीण्य मिळवा. आयएएस झाल्यानंतर स्वप्नवत प्रेम मिळत आहे. पिढ्या घडवण्याचे काम जगदाळे मामांच्या संस्थेत सुरू आहे. मामांची संस्था हृदयाच्या कोपऱ्यात आहे जे काही करायचे ते स्वतःसाठी करा. लोक डोक्यावर घेऊन नाचतील, असेही ते म्हणाले.
यावेळी १३० गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने रोख ५०० रुपये, कर्मवीरांचे पुस्तक व प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पाहुणे चा परिचय जयकुमार शितोळे यांनी करून दिला. प्रास्ताविकात पी. टी. पाटील यांनी संस्थेच्या विविध गुणवत्तावाढीच्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन किरण गाढवे व आनंद कसबे यांनी केले तर आभार अरुण देबडवार यांनी मानले.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.