संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन

starmazanews_v

starmazanews_v


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
निगडी:- तुकोबाची कान्ता सांगे लोकापासी | जातो पंढरीसी स्वामी माझा|| फुटकाच विणा त्याला दोन तारा| घाली येरझारा पंढरीसी || तुका म्हणे कान्तो ऐसे न बोलावे | शरन जावे विठोबासी|| अशा या तुकोबांची पालखीने आज पंढरपुराकडे प्रस्थान ठेवले टाळ मृदंगाने भारावलेल्या वातावरणात विठोबाच्या जय घोषात रमलेले वारकरी अशा रम्य व त्यांना 338 व्या आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. लहान थोर स्त्री पुरुष जात पाहत असा कोणताही भेद न मानत केवळ माऊली ही एकच ओळख सोबत घेऊन आज पालखीने पंढरपूरची वाट चालल्यास सुरुवात केली आहे. यावेळी पंढरीच्या राजाकडे मनासारखा पाऊस पडू दे रे बाबा साकडे करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योग नगरीत आगमन संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उदयोनगरी पिंपरी चिंचवड मध्ये रविवार दिनांक अकरा सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. मनासाठी महापालिका प्रशासन आणि विविध राजकीय पक्षांच्या तसेच संस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षातून दिंडीचे स्वागत करण्यात आले. शहरातील हजारो भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी पालखीचा आजचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शनिवार दिनांक 10 मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणे पहिला मुक्काम देव येथील इनामदार वाड्यात झाला. त्यानंतर रविवारी सकाळी पालखी पुढे निघाली सायंकाळी पाच वाजता निगडी येथे तिच्या आगमन झाले. भक्ती शक्ती चौक विसावा घेतल्यानंतर पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराकडे मुक्कामासाठी रवाना झाली.दिंड्यामधील वारकऱ्यांना विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!