स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा तालुक्यात २०२२ खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते यासाठी अतिवृष्टीमुळे दोन मंडळात शेतकऱ्यांना १६ कोटी वितरण केले परंतु उर्वरित ३ मंडळात अध्याप ही रक्कम वितरीत केलेली नाही तरी तहसीलदार रेणुकादास देवणीकर, कृषी अधिकारी श्री आबासाहेब रुपनवर व पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री संतोष नागटीळक यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या कडून आधार कार्ड बॅंक पासबुक मोठ्या कसरतीने तालुक्याचा अहवाल बनवून कलेक्टर ऑफिस ला दाखल केला या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकार ने एनडीआरएफ एसडीआरएफ च्या निकाशा पलीकडे जाऊन दुप्पट मदत देण्याची घोषणा केली. परंतु सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनच्या पिकांचे नुकसान अहवाल पाठीमागे ठेवुन एनडीव्हीआय समितीस पडताळणी करण्यासाठी मुंबई येथून समिती गठीत करण्यात आली व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सततच्या पावसामुळे मदत देण्यात या टीमने सकारात्मक प्रतिसाद दिला मग परंडा तालुक्यातील शेतकर्यानां उर्वरीत तीन मंडळातील २० कोटी रुपये या २०२३ चालू खरीप हंगाम पेरणी साठी शेतकरी बंधू भगिनींना तात्काळ वितरीत करावेत अशी श्री पाटील बुवा जि प प्रोडुसर कंपनी लि. भोंजा हवेली चे डायरेक्टर गणेशदादा नेटके यांची प्रशासकीय अधिकारी यांना विनंती. तसेच खरीप हंगाम २०२० पिक विमा मधील उर्वरित रक्कम, २०२१ पिक विमा रक्कम, २०२२ पिक विमा अधिक ची रक्कम ही २०२२ खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायत १३५००, बागायत २७०००, फळबाग ३६००० प्रती हेक्टरी असे तीन हेक्टर पर्यंत मदत दिली याच निकषावर २०२०-२१-२२ खरीप हंगामातील वंचित शेतकऱ्यांना सरसकट अनुदान रक्कम वितरीत करावी.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.