आळंदीत माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यादरम्यान पोलिसांनी केला वारकऱ्यांवर लाठीमार .

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
आळंदी:- दरवर्षी आषाढी वारि निमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात.याच पाश्र्वभूमीवर आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उत्साहात पार पडत आहे.दरम्यान , पालखी सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे.आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यावर सौम्य लाठीमार करत बाळाचा वापर केला आहे या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे खरं तर पार्टी प्रस्तावना वेळी मुख्य मंदिरात गर्दी आणि चंद्राचींगली टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील 75 वारकऱ्यांनाच आत घेण्याचे देवस्थान ठरवले आहे तशी विनंती दिंडी मालकांना फडक्यांना आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केली आहे.काहि वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते.यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असण्यार्या पोलिसांनी वारकर्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. गेल्या वर्षी प्रस्तावनावेळी मंदिरात 17000 वारकरी दाखल झाले होते त्यामुळे यावर्षी दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली पालखी सोहळ्याच्या प्रस्तावना सोहळ्याच्या वेळी दिंडीतील प्रत्येक दिंडीतील केवळ 75 वारकऱ्यांनाच आत मध्ये घेऊन जाण्याच्या अहवाल आळंदी देवस्थानकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य मंदिराबाहेर शेकडो वारकरी जमले आहेत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.यावेळी काही वारकर्यांनी मुख्य मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीसांनी वारकर्यांवर सौम्य लाठीमार केला.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!