स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील बांधकाम कामगार म्हणून काम करीत असलेल्या कामगारांना शासनाच्यावतीने सुरक्षा संच व अत्यावश्यक संच (पेटी) चे वाटप करण्यात येत आहे. परंतू या वाटपामध्ये अंधाधुंद अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे तो अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार तात्काळ थांबवावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच (पेटी) या योजनेचा लाभ मिळताना दिसून येत नाही. तो काही त्रयस्त व्यक्तीकडून बांधकाम कामगारांना फोन करुन २ हजार रुपयांची मागणी केली जात आहे. पैसे दिले तरच पेटी मिळत आहे. जर ज्या कंपनीकडून पेटी वाटप चालु आहे. तसेच त्या कंपनीचे जिल्ह्यात कोठेही अधिकृत कार्यालय नाही किंवा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयामध्ये संबंधित कंपनीचा फोन नंबर किंवा पत्ता लावलेला दिसत नाही. तसेच संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्याला फोन केला असता ते फोन उचलत नाहीत. त्यामुळे या योजनेच्या वाटपामध्ये अंधाधुंद कारभार सुरु आहे. तसेच भ्रष्टाचार होत असल्यामुळे संबंधित ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे स्वतः लक्ष देवून हा प्रकार थांबवून बांधकाम कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. यावर पुष्पकांत माळाळे, आनंद भालेराव, बालाजी झेंडे, संकेत सोनवणे यांच्या सह्या आहेत
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.