श्रीमती रूपाली माने आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परांडा दिनांक 2 जून 2023 येथील खानापूर ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक श्रीमती रूपाली वसंत माने यांना जिल्हा परिषद उस्मानाबाद ग्रामपंचायत विभागाने नुकतेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन दि 30 मे रोजी उस्मानाबाद येथे सन्मानित करण्यात आले . श्रीमती रुपाली वसंत माने या ग्रामसेवक म्हणून शासनाच्या विविध योजना गावातील लोकांना माहिती असाव्यात म्हणुन वेळोवेळी मार्गदर्शन केले . त्यांनी सन २०२१ -२२ या वर्षा मध्ये ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामविकास कार्यात केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्ल त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन राहुल गुप्ता प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबद यांच्या हस्ते गौरविण्यात आले . यावेळी त्यांचे पती आयुष्यमान बालाजी कांबळे ग्रामसेवक यांचीही या प्रसंगी उपस्थिती होती .जिल्हा परिषदेच्या कै . यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पार पडलेल्या समारंभास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांची प्रपुख उपस्थिती होती .श्रीमती रूपाली माने यांना मिळालेल्या या आदर्श पुरस्कारामुळे परांडा तालुका व उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे .त्यांच्या या कार्यामुळे विविध विभागात कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!