पै.नानासाहेब पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा येथील युवा उद्योजक शिवश्री रामभाऊ पवार यांचे लहान बंधू पैलवान नानासाहेब पवार यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला . या अशा युवा नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तालुक्यातील तमाम शिवप्रेमी बांधव व मावळे उपस्थित होते आजच्या या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवश्री रामभाऊ पवार यांच्या मनामध्ये दिव्यांगा विषयी असणारी तळमळ पाहायला मिळाली आज नानासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग उद्योग समूह कार्यालय परंडा येथे दिव्यांग बांधव यांच्या समवेत वाढदिवस साजरा करण्याचा योग आला यामध्ये वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले ,तसेच पाचपिंपळा येतील 100% अंध दिव्यांग असणारे लक्ष्मण बारस्कर यांच्या घरावरील पत्रे खराब झाल्यामुळे त्यांची व्यथा साहेबांनी जाणून घेऊन आज नानासाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारस्कार यांना दहा पत्रे मोफत देण्यात आले तसेच संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रम नळीवडगाव येथील वृद्धाश्रमाला भेट देऊन या ठिकाणी किराणा साहित्य देण्यात आले या आश्रमाचे चालक लोखंडे महाराज व या ठिकाणी असणारे 36 वयोवृद्ध माणसे यांच्या समवेत चर्चा करण्यात आली अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम घेऊन हा वाढदिवस साजरा केला हा वाढदिवस साजरा करत असताना छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा शिवश्री रामभाऊ पवार जिल्हा परिषद माजी सभापती नवनाथ आप्पा जगताप मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष महेश ठोंगे दिव्यांग उद्योग समूह अध्यक्ष तानाजी घोडके पुण्य नगरी चे पत्रकार सुरेश घाडगे दिव्यांग धुळीराम हेळकर, शारदा संतोष कुलकर्णी, तानाजी सांगडे, हनुमंत पांगरे, उत्तम शिंदे ,एकनाथ लक्ष्मण वाघमारे, लक्ष्मण सदाशिव बारस्कर ज्योती अनिल कुलकर्णी, तहर अहमद सय्यद ,गणेश राजेंद्र सुतार अमोल शिंदे, पांडुरंग कातुरे यशवंत शिंदे व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!