पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन सभागृह येथे समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.राणा जगजितसिह पाटील, आ. ज्ञानराज चैगुले, आमदार सुरेश धस, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकणी, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत दि. 16 जानेवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त आणि इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाईच्या आनुपालन अहवालास आणि जिल्हा वार्षिक योजना 2022-23 मार्च अखेरच्या 374 कोटी 48 लाख खर्चास सभागृहाने मान्यता दिली.
आढवा बैठकीत पालकमंत्री महोदयांनी महावितरण, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभाग , आरोग्य विभाग, कृषी विभाग, सहकार विभाग आणि इतर विभागांचा आढवा घेतला. जिल्हा वार्षिक योजना 2023-24 साठी अर्थसंकलपित तरतुद 415 कोटी 98 लाख 93 हजार असून मे-2023 अखेर 5 कोटी 96 लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हयाच्या विकासासाठी आणलेल्या निधीचा उत्तम नियोजन करावे असेही पालकमंत्री म्हणाले
यावेळी महावितरण अधिका-यांना निर्देश देतांना पालकमंत्री म्हणाले की शेतक-यांना विजे अभावी पाणी मिळत नाही तेव्हा पिकपेरणी आणि पिकांना पाणी देण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवा. ज्या ठिकाणी ट्रान्सफार्मर नाही त्याठिकाणी लवकरात लवकर उपलब्ध करुन द्या ट्रानफॉर्मरची सद्यस्थिती दर्शवणारा ॲप तयार करावा त्यामध्ये ट्रान्सफार्मरची एकूण संख्या आणि शिल्लक संख्या नमुद असावी तसेच ट्रान्सफार्मरसाठी किती शेतक-यांनी मागणी केली, किती जणांना मंजूरी मिळाली तसेच सदर ॲप मध्ये शेतकऱ्यानी केलेलेल्या तक्रारीची नोंदही असावी आणि त्याचे निराकरण केल्याचे नमूद असावे. पशुसंवर्धन विभागाने मंजूर निधीचा शंभर टक्के वापर करुन सर्व प्रलंबित असलेली कामे तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण करावे.
शेतक-यांना पिककर्ज देण्यास टाळाटाळ करणारे आणि Cibil स्कोर व वयाची कारणे दाखवून कर्ज न देणा-या बँकांविरोध एफ. आय. आर नोंदविण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांना दिले.
यावेळी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्हयात सर्व गावामध्ये समशान भूमींचा प्रश्न मार्गी लावा असे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले. समशान भूमी करिता जागा/ शेड संरक्षण भिंत आणि रस्ता प्राधान्याने जनसुविधा या योजनेमध्ये समाविष्ट करावा प्रत्येक गावाचा सर्वे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!