परंडा येथील जिल्हा उपरुग्णालय येथे दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न.

starmazanews_v

starmazanews_v

परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

दिनांक 02 जून 2023 रोजी परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर उत्साहात पार पडले या शिबिराचे आयोजन उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या आदेशानुसार परंडा येथे हे शिबिर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी होत असून या शिबिराला आज अस्थिव्यंग डॉ.अविनाश भोरे व मनोरुग्ण डॉ शिंदे यांच्या टीमने आज 25 दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी सहकार्य केले तसेच परांडा येथील ग्रामीण रुग्णालयात मधील स्टाफ व नर्स यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले या तपासणीच्या वेळी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके परांडा शहराध्यक्ष गोरख देशमाने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उत्तम शिंदे राहुल कारकर, जीवन तिपाले , पत्रकार प्रकाश काशीद , तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.

*www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898*

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!