परंडा बार्शी मार्गावर एसटी बसला अपघात.

Picture of starmazanews

starmazanews



स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा दिनांक ३ जून रोजी आगाराची एम एच २० बी एल २१९२ क्रमांकाची परंडा बार्शी धाराशिव हि बस – शनिवारी (ता. ०३) सकाळी पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४३ प्रवासी प्रवास करीत होते. परंडा शहरापासून ४ की.मी. अंतरावर असलेल्या परंडा बार्शी – रोडवरील सोनगिरी येथील उल्फा नदीवरील पुलाजवळील वळणावर हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परंडा आगाराची परंडा – बार्शी – धाराशिव हि बस शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बसस्थानकातून सुटली होती.


परंडा शहरापासून ४ कि.मी. अंतरावर परंडा बार्शी रोडवरील सोनगिरी – पुलाजवळील वळणार ७ वाजून ४० मिनिटांनी बस पलटी झाली व हा अपघात झाल्याची माहिती प्रवासी नागरिकांनी दिली. बस मधील ४३ पैकी एकूण ७ जनांना फ्रॅक्चर तेरा जणांना डोक्याला मार लागला तर २३ प्रवासी जखमी झाले आहेत. बार्शी बाजूकडून एक कंटेनर येत असताना समोरूनच एक जीप त्या कंटनेरला ओव्हरटेक करीत बसच्या अंगावर समोर आली असता बस चालकाने धडक टाळण्यासाठी तथा बचाव करण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला घेतली असता घसरून रस्त्याच्या बाजूला कोसळली.
दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानाने व बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. घनटनेची माहिती मिळताच शेजारील लोकांनी प्रवाश्यांना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच जखमींवर परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!