शहरातील रस्ते खोदणाऱ्यांना आयुक्तांचा इशारा.

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- शहरात १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत कोणत्याही प्रकारे रस्ते खोदकाम करू नये, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.त्यानंतरही रस्ते खोदकाम केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.सार्वजनिक आणि खासगी अशा सेवा सुविधांच्या निर्मितीसाठी शहरात सातत्याने रस्ते खोदकाम केली जाते.त्यासाठी खोदकाम शुल्क भरून महापालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे.तर पावसाळ्यात रस्ते खोदकाम पूर्णपणे बंद ठेवणे अपेक्षित असते.मात्र मागील काही वर्षात अवश्य क कामांच्या नावाखाली पालिका कंत्राटदार व इतर खासगी संस्थांकडून पावसाळ्यातही खोदकाम सुरू होती. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघातांना निमंत्रण मिळते. दरम्यान , यावर्षी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी १५ में ते १५ ऑक्टोबर या पावसाळ्यातील कालावधीत रस्ते खोदकाम बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शहरात 15 मे पासून रस्ते खोदकाम बंद करण्यात आल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. या कालावधीत रस्ते खोदकाम बंद ठेवण्यात यावे खोदलेले रस्ते पूर्ववत करावेत परिस्थितीत रस्ते खोदकाम करण्याची आवश्यकता असल्यास त्यांनी महापालिकेचे मान्यता घेण्यात यावी हे प्रस्ताव शहर अभियंता यांची पूर्व मान्यता घेऊन आयुक्त यांच्याकडे सादर करावेत असे आदेशात म्हटले आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!