स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय परिसरात एका कचरा कुंडीजवळ मृत अर्भक सापडले.याप्रकरणी पिंपरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सफाई कामगार सुशील दामोदर भालेराव वय ३८ रा.पिंपळे गुरव यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वायसीएम येथे सफाईचे काम करतात . शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ते हाॅस्पिटलच्या सायन्स गेटजवळ सफाईचे काम करत होते.त्यावेळी त्यांना कचरा कुंडीजवळ स्त्री जातीचे अर्भक सापडले त्यांनी तत्काळ हाॅस्टिल प्रशासनाला याबाबत माहिती दिली.पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्भक ताब्यात घेतले.अज्ञाताने अर्भकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तसेच अपत्य जन्माची लपवणूक करण्यासाठी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अर्भक फेकून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.