पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:-चिखली दि.२५मे २०२३ मित्राचे परिसरात प्रतिष्ठान वाढू लागल्याच्या कारणावरून मित्राने त्याच्या अल्पवयीन साथीदारासोबत गोळ्या झाडून मित्राचा खून केला. ही घटना सोमवार दिनांक 22 चिखली येथे घडली. या प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. सौरभ उर्फ सोन्या बाळासाहेब पानसरे वय 23 राहणार बालके वस्ती मूळगाव राहणार कासारमाळा पानस रेवाडी सुपा तालुका बारामती जिल्हा पुणे असे अटक केलेले आरोपीचे नाव आहे. त्याच्याबरोबर त्याचा अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. कृष्णा उर्फ सोन्या तापकीर असे खून झालेले तरुणाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी चिखली गाव येथे कृष्णा उर्फ सोने तापकीर या तरुणाचा खून झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भर दिवसा गोळीबार करून सोन्या तापकीर्याचा खून केला. घटना घडल्यानंतर गुन्हे शाखा एकला या गुन्ह्याचा समांतर तपास करणे बाबत आदेश देण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दोन पदके तयार केली या पथकांनी चिखली, पुनावळे मोईगाव, यवत, सुपा या भागात आरोपीच्या शोध सुरू केला. दरम्यान पोलिसांनी माहिती मिळाली की सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सरताळा या गावांमध्ये आरोपी सौरभ पानसरे आहे. त्यानुसार पोलिसांनी सरताळा येथील एका कॅनल लगत सापळा लावला. तिथे दुचाकीवरून संशयित आरोपी आल्याचे दिसताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जाऊ लागला पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सह आयुक्त संजय शिंदे, अप्पर आयुक्त वसंत प्रदेशी उपायुक्त स्वप्न गोरे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील व निरीक्षक इमरान शेख, पोलीस अंमलदार बाळासाहेब कोकाटे, मनोज कुमार कमले, महादेव जावळे, सोमनाथ बोराडे ,फारूक मुल्ला अमित खानविलकर, सचिन मोरे ,उमाकांत सरवदे, प्रमोद शिरवळकर अजित रुपनवर, विशाल भोईर मारुती, जायभाये, तानाजी पानसरे, नागेश माळी यांनी केली आहे
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.