www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी ; दहा हजार श्रोत्यांमध्ये एक वक्ता प्रभावी असतो आणि तो प्रभावी वक्ता तुम्हाला बनायचा असेल तर वक्तृत्वाची सूत्र समजून घेऊन भाषण कला अवगत करणे गरजेचे आहे. भाषण करत असताना उस्फूर्तपणा, शांत संयम, आवाजातील आरोह अवरोह, वाचन, अभ्यासू वृत्ती तुमच्याकडे असेल तर भाषण कला तुम्हाला वेगळ्या उंचीवर नवीन नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सचिन वायकुळे यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त, कलायात्री प्रतिष्ठान व अखिल भारतीय छावा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह बार्शी या ठिकाणी, महापुरुषांच्या विचारांचा जागर करत, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
या दोन गटामध्ये संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध 13 जिल्ह्यातून 61 वक्त्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना दोन गटामध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर स्पर्धेमधील सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धाकांना अनुक्रमे खालील प्रमाणे दोन गटामध्ये पारितोषिक देण्यात आले.
मोठा गट :- प्रथम पारितोषिक – दीपक कसबे, पुणे, 7001 रुपये, द्वितीय पारितोषिक – शितल वाघमारे, करमाळा, 5001 रुपये, तृतीय पारितोषिक – संकेत पाटील, कोल्हापूर, 3001 रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक – संतोष राजगुडे, माळशिरस 2001 रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
लहान गट :- प्रथम पारितोषिक – श्राविका जाधव, बार्शी, 5001 रुपये, द्वितीय पारितोषिक – यशराज हेगडे, सातारा, 3001 रुपये, तृतीय पारितोषिक – प्रणाली धस, पांगरी, 2001 रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक – तेजस्विनी आवरगंड, परभणी, 1001 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मार्ट अकॅडमी चे संचालक सचिन वायकुळे हे होते तर विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसट, पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब शेळके, बार्शी नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, मराठा सेवा संघाच्या तालुका अध्यक्ष शोभाताई घुटे, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय पाटील, दलित महासंघाचे शहराध्यक्ष संदीप अलाट, छावा संघटनेचे शहराध्यक्ष निलेश पवार, युवा उद्योजक लखन रजपूत, शुभम तुपे, महाराष्ट्र क्लासेसचे संचालक नवनाथ गुल्हाने, एस आर एस क्लासेसचे संचालक शाहरुख शेख आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी पत्रकार बांधव व श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दिवसभर चालू असलेल्या राज्यस्तरीय खुल्या गटातील वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण, प्रा. अनिल गेळे व व्याख्याते मंगेश दहीहांडे यांनी केले तर टाईम किपर म्हणून स्नेहल विधाते यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराव गाढवे यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा देवकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष धिरज शेळके यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आतिश पालके, परमेश्वर चांदणे, जगन्नाथ जाधव, गणेश राजपूत, गणेश इंगोले, अनंत चाकवते, बबन चकोर, श्यामकुमार शर्मा, अजय कांबळे, प्रतिज्ञा गायकवाड, आदींनी अथक परिश्रम घेतले.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.