बार्टी येथील आंदोलकांना फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक व वंचित बहुजन आघाडी पिं.चिं. जिल्हाध्यक्षांची भेट.

Picture of starmazanews

starmazanews

बार्टी पुणे येथे आंदोलन करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे , वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी दिली भेट .
(आंदोलनाला दिला पाठीबा )
स्टार माझा न्यूज प्रतिनिधी
पूणे (दिनांक – २५ मे २०२३ )
डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधीछात्रवृत्ति BANRF – 2019 – 20 महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठात संशोधन करणाऱ्या अनुसूचित जातीतील एम फील च्या पात्र 172 संशोधक विद्यार्थ्यांना एम फील ,पीएच डी नियमित पाच वर्षे अधिछात्रवृत्ती मिळावी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे अर्थात बार्टी येथे गेल्या चार दिवसापासून आंदोलन सुरू आहे .

या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की शैक्षणिक वर्ष 2019 – 20 मध्ये महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात अनुसूचित जातीतील एम फिल करणाऱ्या पात्र 172 विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या माध्यमातून बी ए एन आर एफ 2019 – 20 अधीछात्रवृती देण्यात आली होती . तीच अधीछात्रवृत्ति युजीसीच्या नियमाप्रमाणे एम फील पीच डी अशी नियमित पाच वर्षे देण्यात येते .

त्याचप्रमाणे बार्टी या संशोधन संस्थेच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या सारथी व महाजोती या संशोधन संस्था देखील सशोधन करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना एम फील पीएचडी अशी नियमित सलग पाच वर्षे अधीछात्रवती देतात . त्याचप्रमाणे बार्टी संस्थेने देखील सन 2018 च्या एम फिल संशोधक विद्यार्थ्यांना एम फील पीच डी नियमित पाच वर्ष अधीछात्रवृति देण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे .

परंतु बार्टी ही संस्था सन 2019 – २० एम फील संशोधक विद्यार्थ्यांना नियमित एम फील पीच डी अधिछात्रवृत्ती पासून वंचित ठेवत आहे .अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यावर अन्याय करत आहे .

या संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत डॉ शहाजी चंदनशिवे राज्य समन्वयक फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्य आणि चंद्रकांत दादा लोंढे जिल्हाध्यक्ष पिंपरी चिंचवड वंचित बहुजन युवा आघाडी यांनी पाठिंबा दिला व सदर विद्यार्थ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मागण्या कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला . यावेळी राज्यातील अनेक संशोधक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते .चार दिवसापासून या विद्यार्थ्यांना एकाही अधिकाऱ्याने विचारले नाही . त्यांची चौकशी केली नाही . या आंदोलनांमध्ये विद्यार्थिनींचाही सहभाग आहे त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची कोणीही सोय केलीली नाही तेव्हा सहानुभूती म्हणून चंद्रकांत दादा लोंढे व डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना चहा बिस्किट केळी इत्यादी वस्तू देऊन त्यांना आधार दिला .

या निवेदनाची प्रत महासंचालक डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद , वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर , वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर , माननीय मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य , माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , गृहमंत्री महाराष्ट्र राज्य , जिल्हाधिकारी पुणे यांना पाठवण्यात आलेल्या आहेत .

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!