हजारो झाडे सुकली वरुन उन्हाचा तडाका आणि खालून आगीचा भडका

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- मोशी बुधवार २४मे२०२३ मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक ६ मधील आरटीओ रस्ता ते आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रालगतच्या रस्त्यांवर लावलेली हजारो झाडे पाण्याअभावी सुकली आहेत.त्यातच झाडांच्या खाली कचरा जाळला असल्याने झाडे करपून गेली आहेत.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने शहरांमध्ये वड,पिंपळ,चिंच,उंबर,आंबा,फणस,पेरू, जांभुळ, सोनचाफा,अडुळसा,रामफळ,बेल,नारळ,कवट,बोर, अर्जुन, कडुनिंब, आदी आयुर्वेदिक व पर्यावरण पूरक हजारो झाडांची लागवड करण्यात आली.मात्र त्यातील अनेक झाडे पाण्याअभावी चुकले आहेत तर काही झाडांच्या खाली चक्क कचरा जाळा जात आहे. या आगीमुळे ही झाडे जाळले आहेत .तर काही अर्धवट करपलेल्या अवस्थेत आहेत. हे झाडे सध्या साधारणतः दहा ते बारा फुटापर्यंत वाढलेले आहेत. मात्र पाण्याअभावी आणि त्यांच्या खाली जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे ती करपत आहेत. या झाडांना याकडे उन्हाळ्यात वेळेवर पाणी देऊन आणि कचरा जाळणे थांबून या वाढणाऱ्या झाडांना जीवनदान देण्याची मागणी वृक्ष प्रेमी मधून होत.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!