स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत बार्शी नगरपरिषदेच्या ६ घंटा गाडीचे लोकार्पण.

starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत बार्शी नगरपरिषदेच्या ६ घंटा गाडीचे लोकार्पण करण्यात आले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून वाहने, यंत्रसामुग्री खरेदी व विविध कामे करणेबाबत महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांचे घनकचरा व्यवस्थापनाकरीता आवश्यक वाहने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता दि. २० मार्च २०२३ रोजीचे पत्रान्वये दिलेली आहे. सुंदर शहर व स्वच्छ शहर होवून शहर प्रदुषण मुक्त होणे करीता शासनाने वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये बार्शी नगरपरिषदेस कॉम्पॅक्टर १ नग, ट्रॅक्टर २ नग, बेलींग मशीन ३ नग, फोर व्हीलर अँटो टिपर ६ नग, हातगाडे २५ नग, थ्री व्हीलर अॅटो २ नग, अशी वाहने गर्व्हरमेंट ई-मार्केट प्लेस (GeM) पोर्टलवरून खरेदी करणेस मान्यता दिलेली आहे. शासनाने प्रत्येक वाहनाची किंमत ठरवून दिलेली असून एकूण र.रू. १,२२,१००००/- (अक्षरी – एक कोटी बावीस लक्ष दहा हजार) इतकी रक्कम नगरपरिषदेस दिलेली आहे.

त्यापैकी नगरपरिषदेने फोर व्हीलर ॲटो टिपर ६ नग CNG गॅसवर चालणारे वाहने GeM पोर्टलवरून रितसर मंजूरीने खरेदी करण्यात आलेले आहेत. शासनाने दिलेल्या दरापेक्षा कमी किंमतीमध्ये घेण्यात आलेले असून प्रती वाहन र.रू नऊ लक्ष पंच्याऐंशी हजार इतका खर्च झालेला आहे. उर्वरीत अन्य वाहने GeM पोर्टलवरून खरेदी करण्याची कार्यवाही चालू आहे.

यावेळी बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,माजी नगराध्यक्ष रमेश पाटील,नवनाथ चांदणे,माजी नगरसेवक विलास रेणके,पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, डि.वाय.एस.पी.जालींदर नालकुल,मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण, कार्यालय अधिक्षक शिवाजी कांबळे, आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद,मिळकत व्यवस्थापक महादेव बोकेफोडे वगैरे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!