जलप्रदूषणामुळे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहे
आळंदी:- वारंवार इंद्रायणी नदी मध्ये केमिकल युक्त पाणी सोडले जात असल्याने दिसून येते आहे त्यामुळे इंद्रायणी नदी मध्ये फेस तयार होत आहे.तरी इंद्रायणी जलप्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी केव्हा बैठक आयोजित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषण सुरू होते.प्रांत अधिकारी यांच्या लेखी पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी जिल्हा अधिकारी पुणे यांच्याशी चर्चा झाली असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण संदर्भात निगडित असलेल्या सर्व यंत्रणाचे संयुक्तपणे बैठक दहा दिवसांमध्ये तरी सदर बैठकीची तारीख वेळ निश्चित झाल्यानंतर आपणास कळविण्यात येईल इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषणाबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेतली असल्याने आपण इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण थांबविणे संदर्भात सुरू असलेली साखळी उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे या लेखी पत्रामुळे इंद्रायणी सेवा फाऊंडेशनच्या उपोषण कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सोडले परंतु इंद्रायणी नदी पुन्हा एकदा जलप्रदूषणामुळे फेसाळलेली दिसून आली. सिद्धबेट जवळील जुन्या बंधार्‍यातून हिवळसर पिवळसर पाणी नदीपात्रात पडून त्याचा मोठ्या प्रमाणात पांढरा फेस निर्माण होऊन पाण्यावर तरंगत होता.

तसेच तेथील फेस वाऱ्यामुळे इतरही उडूनही जात असल्याचे चित्र दिसून येत होते. पुन्हा एकदा जलप्रदूषणामुळे इंद्रायणी नदी फेसाळली आहे. प्रांत अधिकारी यांनी दिलेल्या लेखी स्वरूपातील जलप्रदूषणाबाबत पत्रात नमूद केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रायणी नदीमुळे होणाऱ्या प्रदूषण संदर्भात निगडित असलेल्या सर्व यंत्रांचे संयुक्तपणे बैठक दहा दिवसांमध्ये लावण्यात येणार आहे. ती बैठक जिल्हाधिकारी यांना केव्हा लावणार याकडे आता आळंदी करांचे लक्ष लागले आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!