भूम मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे का फासू नये, सर्व पक्षीयांच्या वतीने इशारा.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

भूम नगर परिषदेमध्ये एक जानेवारी 2022 पासून प्रशासक म्हणून नगरपरिषदेची जबाबदारी मुख्याधिकारी यांनी स्वीकारलेली आहे. मुख्याधिकारी हे मागील सत्ताधाऱ्याच्या सांगण्यावरून सर्वपक्षीय तसेच शहरातील नागरिकांच्या समस्येकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. शहरात सुरू असलेल्या कामाबद्दल कुठलीही माहिती नगरपालिकेकडून दिली जात नाही. तसेच शहरातील विविध समस्या बाबतीत सर्व पक्ष्यांच्या वतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत. पण त्या निवेदनावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. तसेच शहरात सुरू असलेले विकास कामे कोणताही आराखडा न तयार करता मुख्याधिकारी तसेच अभियंता व ठेकेदार हे संगणमत करून निकृष्ट दर्जाचे कामे करताना दिसत आहेत. या सर्व बाबीकडे मुख्याधिकारी तथा प्रशासक डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तसेच शहरातील काही विकास कामाचे टेंडर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी भरलेले होते. त्यांची टेंडर जाणून बुजून प्रतिस्पर्ध्याला दाखवून ते टेंडर रद्द करण्यात येत आहेत. याविषयी वेळोवेळी लेखी तक्रार देऊनही मुख्याधिकारी या तक्रारींना दाद देत नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिक व सर्वपक्षीय यांनी चिडून नगरपालिकेच्या मनमानी कारभाराला कंटाळून निषेध म्हणून मुख्याधिकाऱ्याच्या तोंडाला काळे का फासू नये अशा प्रकारचे निवेदन दिले आहे. अशा प्रकारचे निवेदन पहिल्यांदाच अनुभवायला आले आहे. त्याची एक प्रत पोलीस स्टेशन भूम येथेही देण्यात आलेली आहे. सदरील निवेदनावर भूम शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब मस्कर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश आप्पा शेंडगे, भाजप सरचिटणीस संतोष सुपेकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष एडवोकेट प्रकाश आकरे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड, विलास शाळू, सचिन बारगजे, अमोल सुरवसे हेमंत देशमुख, चंद्रकांत गवळी, बाबासाहेब वीर शंकर खामकर , मेहबूब शेख यांनी निवेदन दिले आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!