जि.प.कन्या प्रशाला परंडा १९९०-९१ बॅच 33 वर्षानंतर वर्गमैत्रिनी एकत्र.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा प्रतिनिधी -येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील १९९०-९१ सालच्या माजी विद्यार्थ्यांनींचा रंगला स्नेह मेळावा.तब्बल ३३ वर्षानंतर १९९०-९१ च्या बॕचच्या मुली आल्या एकत्र यावेळी निवृत्त मुख्याध्यापक एस.के.शिंदे,निवृत्त मुख्याध्यापीका पुष्पा वडाणेरकर आदि !
छायाचिञ-आदित्य नांगरे
परंडा , ता.७ (प्रतिनिधी ) ज्ञानादानाची शिदोरी घेवुन आपल्या विद्यार्थीनींनी विविध क्षेञात घेतलेली यशस्वी भरारी पाहुन शिक्षकांना मनस्वी आनंद लाभतो.प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवुन नेहमी वाटचाल करावी असे मत जेष्ठ माजी मुख्याध्यापीका पुष्पा वडनेरकर यांनी जिल्हा परिषद कन्या शाळेत आयोजित केलेल्या माजी विद्यार्थीनींच्या स्नेह मेळाव्यात व्यक्त केले.
येथील नगरपालिकेलगत असलेल्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेत १९९०-९१ साली शिक्षण घेतलेल्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या बॕचच्या मुलींचा “गेट टुगेदर” स्नेहमेळावा शनिवार ता . ६ रोजी घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ निवृत्त शिक्षिका पुष्पा वडणेरकर,जेष्ठ निवृत्त मुख्याध्यापक एस.के.शिंदे, जेष्ठ निवृत्त शिक्षक विनायख जाधव, निवृत्त शिक्षिका सत्यभामा जाधवर, नागरबाई बनसोडे, सध्या कार्यरत मुख्याध्यापक अंकुश जाधव, मुख्याध्यापक महादेव विटकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शालेय जीवनातील लहानपणीच्या मैत्रीणींची साथसोबत अखंड आयुष्यभर टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये ओलावा निर्माण व्हावा यासाठी मैत्रीचे ऋणानुबंध घट्ट होणे गरजेचे आसते. असाच एक कार्यक्रम परंडा शहरांमध्ये असलेल्या जि.प.कन्या प्रशालेतील १९९० च्या बॅचच्या मुलींचा संपन्न झाला. तब्बल ३३ वर्षानंतर सुद्धा विविध क्षेञात कार्यरत, आपापल्या संसारात स्थिर रममाण झालेल्या जिवाभावांच्या सखी-सहेली दुरगावाहुन जेंव्हा एकत्र येतात त्यावेळेला शाळेतील गमतीजमती, वर्गात केलेल्या खोड्या, बांईचा खाल्लेल्या छड्या, मार, दुपारच्या सुट्टीतील मैञिणींच्यासोबती खाल्लेला डब्बा अशा जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या मैत्रीची नाळ पुन्हा घट्ट केली.असंच काहीसं या स्नेह मेळाव्यात झालं .३३ वर्षांपूर्वीच्या फाक्त मुलींसाठी असलेल्या जि.प.शाळेतील अनेक गमतीजमती, आजच्या संसारातील अनेक गोष्टी, पाल्य मुलामुलींच्या शैक्षणिक वाटचालीसह आणि भविष्यातील नव्या गोष्टींचा ध्येयाचा वेध असा जणू काय एक विचारांचे वादळ, आपल्या तत्कालीन गुरुंची भेट, मनमोकळ्या गप्पा आणि स्नेहबंध जुळण्याचा हा क्षण होता.यावेळी जेष्ठ निवृत्त शिक्षक, शिक्षिकांनी भावी जीवनवाटचालीसाठी मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात जेष्ठ निवृत्त शिक्षक विनायक जाधव यांचा वाढदिवस साजरा केला. विद्यार्थीनी प्रा.अनिता मोहिते म्हणाली की,तब्बल ३३ वर्षानी शाळेत पाऊल टाकले.येथील शाळा प्रांगणात आल्यावर आम्हां मैञिणींना खुप आनंद वाटला.जुन्या शिक्षक शिक्षिकांना भेटुन भारावुन गेलो.शाळेत शिकताना हातावर घेतली छडी, म्हणुनच आयुष्याची नीट बसली घडी अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत शाळेतील गोड आठवणीं सांगितल्या .विविध क्षेञात असलेल्या विद्यार्थीनी शिक्षिका सुषमा चव्हाण,सुनिता वरुडेकर, माधवी शेरखाने,निलम पटेल,मनीषा थोरबले,ज्योती देशमुख,नाजीम शेख, कौसर पठाण,मनीषा शिंदे नाजमीन पठाण या सखींनी मनोगत व्यक्त करीत शालेय बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. शनिवारी दिवसभर एकमेकींशी झीम्मा फुगडीसह, गप्पा मारल्यानंतर परतीच्या प्रवासात जड होणारी पाऊले, भरून येणारे डोळे आणि जड अंतकरणाने चल पुन्हा भेटूया गं असे म्हणीत एकमेकींचा निरोप घेणाऱ्या सखी सहेली मैञिणी पाहिल्यानंतर महिलाभगिनींनाही मैत्रीणींची किती ओढ असते हे सिद्ध झालं.
या स्नेह मेळाव्यासाठी प्रा.अनिता मोहिते, माधवी शेरखाने यांनी पुढाकार घेतला होता. ३३ वर्षानंतर या कन्या शाळेत आल्यानंतर एक वेगळा अनुभव अनुभवास मिळाला असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. विविध क्षेत्रात काम करत असताना या जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेने दिलेले संस्कार आत्मसात करून आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत आहोत. भविष्यात या शाळेस आमची गरज भासल्यास आम्ही नक्कीच सहकार्य करू असेही आश्वासन माजी विद्यार्थींनीनी दिले.
सूत्रसंचालन व प्रस्तावना प्राध्यापीका अनिता मोहिते यांनी केले.आभार माधवी शेरखाने यांनी मानले.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!