परंडा मार्केट यार्ड समोर गतिरोधक बसवन्यात यावा. स्वराज्य संघटनेची मागणी

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

करमाळा रोड वर मार्केट यार्ड समोर गतिरोधक बसवन्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन, स्वराज्य संघटनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

याबाबत मा. अभियंता साहेब
सार्वजनिक बांधकाम विभाग,
परंडा जि. धाराशिव. यांना दिलेल्या निवेदनात
परंडा करमाळा रोडवर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार सामिती समोर दिवसातून कमीत कमी ३ अपघात होत आहेत. आपल्या तालुक्यासह अजूबाजुच्या तालुक्यातील शेतकरी आपला माल विकण्यासाठी आपल्या कृषी उ. बा. समितीमध्ये येत असतात. तसेच करमाळा रोडवर ५० च्या आसपास भूसार दुकाने आहेत. यामुळे येथे लहान वाहनांसह मोठ्या वाहनाची देखील रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच बावची चौकातील मार्केट देखील चांगले चालत असल्यामुळे येथील रहदारी बरीच आहे. तसेच आवटी येथिल दर्गा व श्री क्षेत्र सोनारी येथे जाण्यासाठी या रोडवर रहदारी असते. या कृषी उ. बा. समिती समोर रहदारीमुळे रोजच अपघात होत आहेत. यावर उपाय म्हणून करमाळा रोडवर कमीत कमी चार ठिकाणी गतिरोधक बसविण्यास यावेत अन्यथा स्वराज्य संघटना तीव्र आंदोलन छेडेल. असे म्हटले आहे.
निवेदनावर मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे, राजु शिर्के, सीताराम सातपुते, राजाभाऊ ढावरे, अमोघ म्हस्के, अभय म्हस्के, राजेश सातपुते, गणेश शिंदे, बैभव राऊत,सचिन खबाले, तुषार जाधव, अक्षय वाघमोडे, गोपीनाथ खैरे, आबा मोरजकर, मोहसीन पठाण, शाहनवाज बोराटे, राजेंद्र चौधरी, प्रवीण नलवडे, महेश बागल, दत्तात्रय पोपळे, अजीम मुजावर, फरीद शेख, जाकीर पटेल, बापू माळी आदी कार्यकर्ते व व्यापारी यांच्या सह्या आहेत. सदरचे निवेदन माहितीस्तव तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन परांडा यांना देण्यात आले आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!