परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे आज दिनांक २८ एप्रिल रोजी मोठ्या चुरसीची निवडण होवून आज मतदान शांततेत पार पडले उमेद्वराचे भवितव्य मतपेटीत उद्या निकलाचा फैसला होणार या अटी तटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार यांकडे पुर्ण जिल्हयाचे लक्ष लागले या तालुक्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या निवडणुकीत दुरंगी सामाना रंगला होता या निवडणुकीत महाविकास आघाडी कडुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व राष्टवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या नेतृत्वा खाली शेतकरी महा विकास अघाडी पॅनल तसेच महायुतीकडून जिल्हयाचे पालक मंत्री राज्याचे अरोग्य व कुंटुब कल्याण मंत्री डॉ तानाजीराव सावंत व भाजपा प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हि दुरंगी एकदम चुरशीची निवडणुक मतदान पार पडले फैसला उद्या होणार कोण बाजी मारणार याकडे जिल्हपाचे लक्ष लागले आहे या निवडणुकीत एकूण मतदान १३९७ पैकी १३७८ मतदान झाले ९८ % मतदान झाले सोसायटी मतदार संघात २८६ मतदानापैकी २७६ मतदान झाले ग्रामपंचायत एकूण मतदान २८८ मतदाना पैकी २८० मतदान झाले व व्यापारी एकण मतदान ८५ मतदानापैकी ८४ मतदान झाले तर हमाल माथाडी एकूण मतदान ४६ मतदानापैकी ४६ मतदान झाले
कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा निवडणुकीत
मतदान केंद्रावर झालेले मतदान
*परंडा बुथ*
सोसायटी मतदारसंघ – ४०७ पैकी ४०६
ग्रामपंचायत मतदारसंघ – २८८ पैकी २८६
व्यापारी मतदारसंघ ८५ पैकी ८४
हमाल मापाडी मतदारसंघ ४६ पैकी ४६.
*अनाळा*
सोसायटी मतदारसंघ -२८३ पैकी २७६
ग्रामपंचायत मतदारसंघ – २८९ पैकी २८०
*एकुण*
सोसायटी मतदारसंघ – ६८२
ग्रामपंचायत मतदारसंघ – ५६६
व्यापारी मतदारसंघ ८४
हमाल माथाडी मतदारसंघ ४६.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.