भगवंत महोत्सवाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी नगरीचे ग्रामदैवत श्री भगवंत प्रकटोत्सव निम्मित बार्शी नगरपालिका,भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भगवंत महोत्सवाचे उद्घाटन बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत शुभहस्ते तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

भगवंत महोत्सव २०२३ मध्ये दि २६ एप्रिल ते २ मे पर्यंत विविध मनोरंजनात्मक,आध्यात्मिक, सामाजिक आणि महाप्रसाद कार्यक्रमाची रेलचेल आयोजित करण्यात आली आहे.संपूर्ण भारत देशात भगवंताचे एकमेव मंदिर असुन भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून भगवंताची किर्ती सगळीकडे पसरावी तसेच बार्शी तालुक्यातील लोकांचे विविध सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमातून मनोरंजन व्हावे यासाठी हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.यावेळी डॉ.बी.वाय.यादव,भगवंत देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब बुडूख,बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शेठ लोढा,गटनेते विजय राऊत,माजी नगरसेवक विलास रेणके,रमेश पाटील,वैरागचे नेते संतोष निंबाळकर,बाजार समितीचे सभापती ॲड.रणवीर राऊत,डीवायएसपी जालिंदर नालकुल,तहसीलदार सुनील शेरखाने,पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी,मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण,नायब तहसीलदार संजीवन मुंढे,जिल्हा परिषद उपअभियंता गौंडरे साहेब,उप अभियंता सोनवणे साहेब, जलजीवन मिशनचे अधिकारी वाघमारे साहेब,वैद्यकीय अधिकारी डॉ.शितल बोपलकर,गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले तसेच इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

अशी असेल कार्यक्रमाची मेजवानी
starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!